Teachers are investigating citizens at the risk 
कोल्हापूर

जीव धोक्‍यात घालून शिक्षक करताहेत नागरिकांची तपासणी 

संजय खूळ

इचलकरंजी : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दररोज पालिका शिक्षण मंडळाकडील 250 शिक्षक दररोज सरासरी 20 ते 25 हजार नागरिकांची तपासणी करत आहेत. मात्र, शिक्षकांना सुरक्षिततेसाठी पिपीई किटच दिले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. प्रशासनाचा आदेश मानून हे शिक्षक आपला जीव धोक्‍यात घालूनच गेले पाच ते सहा दिवस काम करीत आहेत. 

शहरात सामूहिक करून संसर्गास प्रारंभ झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाला प्रत्येक नागरिकांचे आरोग्य तपासणीचे आदेश दिले आहेत. यानुसार स्थानिक प्रशासनाने शहरातील प्राथमिक शिक्षक, अंगणवाडीच्या सेविका आणि आशा सेविका यांची नेमणूक केली आहे. तब्बल 500 हून अधिक जण प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक नागरिकांचे रक्तदाब आणि त्यांचे ताप मोजण्याचे काम करीत आहेत. त्याचबरोबर आवश्‍यक ती माहिती ही भरून घेत आहेत. या कामासाठी पालिका शिक्षण मंडळाकडून तब्बल अडीचशे शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 

हे शिक्षक दररोज 30 ते 40 कुटुंबांना भेट देऊन सरासरी दोनशे व्यक्तींची तपासणी करीत आहेत. दोन शिक्षक मिळून हे काम करीत असून दररोज 20 ते 25 हजार नागरिकांचे आरोग्य तपासणीचे काम या शिक्षकांच्या मार्फत होत आहे. शहरात तब्बल 25 हून अधिक भाग बाधित क्षेत्र म्हणून जाहीर झाले आहेत, असे असताना हे काम करणाऱ्या शिक्षकांना प्रशासनाने साधे कीट सुद्धा दिले नाही ही मोठी गंभीर बाब बनली आहे. 

आजार असतानाही काम... 

महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशात 55 वर्षावरील शिक्षकांना तसेच ज्यांना रक्तदाब शुगर व आणि गंभीर आजार तसेच गर्भवती आहेत, त्यांना शाळेमध्ये न येता घरातून काम करण्यास आदेश दिला आहे. मात्र, नगरपालिका कर्मचारी शिक्षण मंडळाकडील 35 शिक्षकांना असे आजार असतानाही काम करणे बंधनकारक झाले आहे. त्याचबरोबर पाच महिला या गर्भवती सुद्धा आहेत. 

दृष्टीक्षेपात 
- तपासणीसाठी अडीचशे शिक्षकांची नेमणूक 
- शिक्षक वगळता अन्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीट 
- दररोज केली जातेय 30 ते 40 घरांची तपासणी 
- सरासरी दोन शिक्षक करताहेत दोनशे नागरिकांची तपासणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT