teachers service in school for five years decision of government in kolhapur 
कोल्हापूर

एका शाळेत शिक्षक पाच वर्षे राहणार; शासनाचे सुधारित बदली धोरण

राजेंद्र पाटील

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण शासनाने जाहीर केले. खो-खो पद्धतीच्या बदलीत शिक्षकांना दिलासा मिळाला असून यापुढे एका शाळेत शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तो बदलीस पात्र होणार आहे. याशिवाय अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करण्यासाठी निकष जाहीर केले आहेत.

ग्राम विकास विभागाने यापूर्वी 27 फेब्रुवारी 2017 ला प्राथमिक शिक्षकांसाठी बदल्यांचे धोरण जाहीर केले होते. राज्यस्तरावरून ऑनलाईन पद्धतीने खोखो स्वरूपाच्या या बदल्या होत होत्या. या धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. दोन वर्षात शासनाने नऊ शुद्धिपत्रके काढली होती, परंतु तरीही बदली धोरणाबाबत शिक्षक संघटनात मोठा असंतोष होता.

अखेर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा करण्यासाठी बदली अभ्यास गट स्थापन केला.या अभ्यास गटाने लोकप्रतिनिधी, पालक व शिक्षक संघटना यांच्याशी चर्चा केली. सुधारित धोरण तयार करून ते आज जाहीर केले. शिक्षकांच्या बदलीचे सुधारित धोरण जाहीर केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी एका पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे.

बदली धोरणातील प्रमुख बदल

विद्यमान शाळेत शिक्षकांची सेवा पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच बदलीस पात्र विशेष संवर्ग 1 व 2 मधील शिक्षकांनी बदलीचा लाभ घेतल्यानंतर त्यांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. 30 शाळांचा पसंतीक्रम बदलीसाठी द्यावा लागणार. अवघड क्षेत्राच्या सात निकषापैकी तीन निकष पूर्ण केलेले गाव/शाळा अवघड क्षेत्र शाळा म्हणून घोषित केली जाणार आहे.

सकाळचे अचूक वृत्त 
अवघड क्षेत्रातील शाळा ठरविण्यासाठी सात निकष जाहीर होणार, सुधारित बदली धोरण जाहीर होणार अशी बातमी दैनिक सकाळने प्रसिद्ध केली होती. सकाळचे हे वृत्त अचूक ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

SCROLL FOR NEXT