Teachers should come to school only two days in a week 
कोल्हापूर

शिक्षकांनी आठवड्यातून दोन दिवसच शाळेत यावे

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : लॉकडाउनमुळे सार्वजिनक वाहतूक व्यवस्था बंद आहे. अशा वेळी शिक्षकांना येण्यास अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी शिक्षकांनी ई-लर्निंगची तयारीसाठी आठवड्यातून दोन दिवस शाळेमध्ये उपस्थित राहावे, असा आदेश माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी काढले आहेत. याचे परिपत्रक मुख्याध्यापक, प्राचार्या दिले आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक वर्षाला उशिरा सुरुवात झाली. शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात काही आदेश काढले. त्यानुसार 9 वी आणि 10 वी चे वर्ग जुलैमध्ये सुरू होणार होते; मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने 31 जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर केला. जिल्हा प्रशासनाने पालकांनी विद्यार्थ्यांना 31 जुलैपर्यंत शाळेत पाठवू नये असे सांगितले. त्यामुळे शाळा ऑगस्टनंतरच सुरू होतील. 

आज माध्यमिक शिक्षण अधिकारी लोहार यांनी शिक्षकांनी शाळेत आठवड्यातून दोन दिवसच यावे. असे परिपत्रक काढले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यास अडचणी येण्याची शक्‍यता आहे. शाळा सुरू करण्याची तयारी व ई-लर्निंगसाठी मुख्याध्यापकांनी आठवड्यातून दोनवेळा शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत सूचना द्याव्यात, असे आदेशात म्हटले आहे. या शिक्षकांची शाळेत उपस्थिती अत्यावश्‍यक असेल तर शाळा व्यवस्थापन समितीशी संपर्क साधून परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा. 

वर्क फ्रॉम होमचा मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीने आठवड्यातून एकदा आढावा घ्यावा. ई-लर्निंगद्‌वारे अध्यापन करताना येणाऱ्या शिक्षकांच्या अडचणीचे निराकरण करावे, कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थी, पालकांचे संपर्क साधून समुपदेशन करावे. असे परिपत्रकात म्हटले आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

का झाला हृतिक रोशन- सुझान खानचा घटस्फोट? भाऊ जायेदने सांगितलं कारण, म्हणाला- हृतिकची गर्लफ्रेंड

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

आनंदी मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम; सकाळ वृत्तपत्राच्या सहाय्याने केला ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग

SCROLL FOR NEXT