Teachers from today in school, students at home 
कोल्हापूर

शिक्षक आजपासून शाळेत, विद्यार्थी घरातच

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळे यंदा शैक्षणिक वर्षाला उशिरा सुरुवात होणार आहे; मात्र शाळा सोमवार (ता. 15) पासून सुरू कराव्यात असा शासनाचा आदेश आहे. त्यामुळे आजपासून शाळा सुरू होणार आहेत.

विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्टनंतर शाळेत उपस्थित रहावे, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीच शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी घरातच असे चित्र असणार आहे. 

राज्यातील सर्वच शाळांच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभावर कोरोनाचे संकट होते. त्यामुळे यंदा शाळा केव्हा सुरू होणार याची सर्वांनाच चिंता लागली होती. दोन आठवड्यापूर्वी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्टनंतर शाळेत प्रवेश घ्यावा असे जाहीर केले. मात्र राज्य सरकारने शाळा 15 जूनपासून सुरू कराव्यात असा आदेश काढला. त्यामुळे आजपासून शाळा सुरू होतील. मात्र विद्यार्थी येणार नाहीत.

त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांविना शाळा अनुभवावी लागणार आहे. शिक्षक शाळेमध्ये येऊन वार्षिक नियोजन, अभ्यासक्रमाची तयारी कामे करणार आहेत. या शिवाय विद्यार्थ्यांना पुस्तके वाटण्याचे कामही शिक्षकांना करावे लागणार आहे. काही शाळांनी दहावीचे ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. यंदा पहिल्यांदाच शिक्षक शाळेत असतील आणि विद्यार्थी घरामध्ये असणार आहेत. 

दृष्टिक्षेप 
- यंदा शाळा केव्हा सुरू होणार याची चिंता होती.
- दोन आठवड्यापूर्वी केंद्र सरकारने जाहीर
- शिक्षक वार्षिक नियोजन, अभ्यासक्रमाची तयारी कामे करणार 
- काही शाळांनी दहावीचे ऑनलाईन वर्ग सुरू केले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT