Teacher's Transfer Canceled Due To Students' Tears Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

विद्यार्थ्यांच्या अश्रूंनी शिक्षकाची बदली रद्द

बाळासाहेब कांबळे

हुपरी : रेंदाळ येथील एका शाळेतील शिक्षकाच्या झालेल्या बदलीमुळे विद्यार्थी, पालक आज थेट रस्त्यावर उतरले. बदलीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंनी अखेर प्रशासनास त्या शिक्षकाची बदली रद्द करण्यास भाग पाडले. विक्रम बाळू कोरवी असे या विद्यार्थी प्रिय शिक्षकाचे नांव आहे. या शिक्षकाने ज्ञानदानाने विद्यार्थ्यांशी विणलेल्या गुरू शिष्यांच्या या आगळ्या नात्याची चर्चा सुरू आहे. 

कोल्हापूरमधील एका शैक्षणिक संस्थेच्या रेंदाळ येथील शाळेत विक्रम कोरवी हे सात आठ वर्षांपासून शिकवत आहेत. ते सध्या दहावीचे वर्गशिक्षक होते. ते विज्ञान विषय शिकवतात. ओघवती शैली, विषय समजून सांगण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना त्यांची गोडीने लागली होती. दरम्यान, संस्थेच्या प्रशासकीय कामकाज पद्धतीनुसार त्यांच्या बदलीचा आदेश आला. त्यामुळे कोरवी हे बदलीच्या ठिकाणी रवाना होण्यासाठी तयारी करू लागले.

ही बाब विद्यार्थी, पालकांना समजताच त्यांनी कोरवी यांना शाळा सोडून न जाण्याची विनंती केली. मात्र, नाईलाज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाचशेहून अधिक विद्यार्थी पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत शिक्षक कोरवी यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान, पालकांबरोबर मुख्याध्यापक यांची बैठक झाली. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणली. त्यामुळे संस्थेचे सचिवांनी शिक्षक कोरवी यांची बदली रद्द केल्याचे पालकांना दूरध्वनीवरून सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.  

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्री! रात्री उशिरा मुंबईकडे रवाना; प्रथमच महिलेकडे पद

काटेवाडी ते मंत्रालय... नेतृत्वासाठी तयार झालेलं व्यक्तिमत्त्व; सामाजिक कार्यकर्ता ते उपमुख्यमंत्रीपद, सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक प्रवास

Mumbai Traffic: मुंबईत १ तारखेपासून नवीन वाहतूक नियम; दक्षिण भागात अधिक कठोर नियम, 'या' वाहनांना प्रवेश नाही

Budget 2026: बजेट तयार करण्यासाठी किती वेळ लागतो? ‘ब्लू शीट’ म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या पडद्यामागची प्रक्रिया...

Pune Traffic : नवले पुलावर तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान लेन बंद; कात्रज जुना बोगदा आणि सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT