Teasing a minor girl in kolhapur 
कोल्हापूर

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम चोप 

सकाळ वृत्तसेवा

बिद्री (कोल्हापूर) : बोरवडे (ता. कागल) येथील अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या संशयिताला ग्रामस्थांनी चांगलाच बेदम चोप दिला. या घटनेतील संशयित तरुण राधानगरी तालुक्‍यातील असल्याचे समजते. 

घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, आज दुपारी दोनच्या सुमारास बोरवडेतील विठ्ठल मंदिरानजीक मुले खेळत होती. यावेळी संशयित तरुणाने मुलीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. भेदरलेल्या मुलीने संशयिताच्या हाताला हिसका देऊन घरी पळ काढला. 

संबंधित बालिकेने घडलेली घटना घरी सांगताच तिच्या पालकांनी परिसरात शोधाशोध केली. या वेळी मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुणाला पाहताच मुलीने त्याला ओळखले. त्याने शेताकडील रस्त्यावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी पाठलाग केला असता संशयित दुचाकी टाकून उसाच्या शेतात लपून बसला. ग्रामस्थांनी शोधाशोध केल्यानंतर तो हाती लागला. यावेळी ग्रामस्थांनी त्याला बेदम चोप दिला. 

मनोरुग्ण असल्याचा संशय 

संशयित राधानगरी तालुक्‍यातील एका गावचा असून, तो मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यापूर्वीही त्याने आपल्याच गावात असा प्रकार केल्याची चर्चा गावामध्ये आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT