Tehsildar of Kagwad escaped from the accident 
कोल्हापूर

कागवाडच्या तहसीलदार अपघातातून बचावल्या...

सकाळवृत्तसेवा

मांजरी (बेळगाव) - कागवाडच्या तहसीलदार प्रमिळा देशपांडे यांची कार व ऐगळी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी शिवनगोडा एस. पाटील यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. मांजरी-शिरगुप्पी रस्त्यावरील मांजरीवाडी गावानजीक आज (ता. २४ ) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातातून तहसीलदार देशपांडे या बचावल्या असून किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर शिवनगोडा पाटील हे गंभीर जखमी असून उपचारासाठी चिक्कोडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या घटनेची नोंद अंकली पोलिस स्थानकात झाली आहे.

या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कागवाडच्या तहसीलदार देशपांडे या आपल्या कारने  (एमएच १० एजीे ४५०९) पती लक्ष्मण कबाडे यांच्यासमवेत  चिक्कोडीहून कागवाडकडे जात होत्या. याचवेळी ऎगळी पोलिस स्थानकातील कर्मचारी शिवनगोडा पाटील हे दुचाकीने  (केए ३९ जे ९९८८) ऎगळी येथून कोगनोळी चेकपोस्ट नाक्यावर कामावर जात होते. मांजरी-शिरगुप्पी रस्त्यावरील मांजरीवाडी गावानजीक आले दुचाकी व तहसीलदारांच्या कारची धडक झाली. दुचाकीवरील पोलिस कर्मचारी शिवगोंडा पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी तात्काळ स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेतून चिक्कोडी सरकारी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले.
 घटनास्थळी अंकली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक  लक्ष्मणप्पा आरी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून तपास सुरु ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT