temple of Jyotiba inaugurated today after seven months and twenty four days 
कोल्हापूर

भाविकांना झाला आनंद; तब्बल सात महिने चोवीस दिवसानंतर जोतिबाचे मंदिर आज उघडले

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : कोरोना संसर्गामुळे बंद असलेले दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे मंदिर  तब्बल सात महिने चोवीस दिवसानंतर आज उघडण्यात आले . आज सकाळी मंदिर परिसरात ग्रामस्थ, पुजारी,  भाविकांनी जोतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष केला .


ज्योतिबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सकाळी नऊ ते बारा व दुपारी चार ते सात या वेळेत शासकीय अटी नुसार नियमाचे पालन करून जोतिबा मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले
 यामध्ये भाविकांना दर्शना व्यतीरिक्त कोणतेही धार्मिक विधी, होमहवन पुजा, अभिषेक भक्ताना करता येणार नाहीत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यामध्ये  शासकीय नियमाप्रमाणे
कालानुरूप आवश्यक ते बदल करेल.    


मंदिरात प्रवेश करण्यापुर्वी भाविकांनी तोंडावर मास्क लावून प्रवेश करने बंधनकारक आहे. आज मंदीरात दर्शनासाठी  आलेल्या कोरोना योध्दाना  प्रथम  प्रवेश दिला गेला. त्यांनी कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी आपली सेवा चांगल्या प्रकारे दिली होती . मंदिरामध्ये  सकाळी दर्शनापूर्वी, दर्शन मार्ग व दर्शनाची रांग सॅनिटायझर करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ ते १२ या वेळेत दर्शन झाल्यानंतर पुन्हा दर्शन मार्ग व दर्शनाची जागा सॅनटाईझ करण्यात आली.

भाविकांना  पश्चिम दरवाजातून  जोतिबा मंदिरात प्रवेश दिला  व दक्षिण दरवाजातून बाहेर जाण्याचा मार्ग करण्यात आला आहे. अत्यावशक सेवेसाठी मंदिराच्या शेजारी एक ॲम्बुलन्स ची सोय करण्यात आली आहे. तसेच मंदिरांमध्ये असलेल्या प्राथमिक उपचार केंद्रामध्ये आवश्यकतेनुसार डॉक्टर उपलब्ध करण्यात आले आहेत

. भाविकांनी दर्शन करते वेळी दर्शन रांगेत ६ फूटअंतर ठेवावे. मंदिराबाहेर कोरोना रोगाचे अनुषंगाने सूचना फलक लावण्यात आले असून, त्याप्रमाणे भाविकांनी सूचनांचे पालन करून देवस्थान समिती व प्रशासनास सहकार्य करावे. भाविकांनी साहित्य घेऊन मंदिरामध्ये येऊ नये. आपले  साहित्य मंदिराच्या बाहेर आपल्या जबाबदारीवर ठेवावे.फक्त दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करून देवस्थान समितीस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या जोतिबा डोंगरावर आनंदाचे  वातावरण आहे.  त्यामुळे  चांगभलची ललकारी कानावर पडणार आहे आणि भाविक भक्तांना ज्योतिबाचे दर्शन मिळणार आहे. त्यामुळे ते आनंदाने भाराहून गेले आहेत.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT