Ten reports of contact with a woman in Belgaum were also negative 
कोल्हापूर

हूश्श्श... बेळगावातील 'त्या' महिलेच्या संपर्कातील दहा जणांचेही अहवाल निगेटिव्ह...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - बेळगाव शहरातील सदाशिवनगर येथील कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील दहा जणांचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागातून मिळाली आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील कोरोनाचा धोका काही अंशी कमी झाला आहे.14 मे रोजी सदाशिवनगर येथील गर्भवती महिला कोरोना बाधीत असल्याचे उघडकीस आले होते. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले होते. क्वारंटाईन केल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी त्यांच्या घशातील द्राव घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 1 जून रोजी त्यांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार त्या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे सदाशिवनगर परीसरातील धोका कमी झाला आहे. बेळगाव शहरात सध्या सदाशिवनगर येथे एकमेव कंटेनमेंट झोन आहे. उर्वरीत सर्व कंटेनमेंट झोन रद्द करण्यात आले आहेत. आता तेथील कोरोनाबाधीत महिला बरी होवून घरी परतल्यानंतर तो कंटेनमेंट झोनही रद्द होईल. बेळगाव शहर कंटेनमेंट झोन मुक्त होईल.

सदाशिवनगर येथील महिला मुंबई येथून आली होती. कर्नाटकात येण्याची परवानगी नसतानाही त्या महिलेने बेळगावत प्रवेश केला होता. ती महिला आपल्या घरीच होती, पण तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन व आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली. त्या महिलेचे आई, वडील, भाऊ व वहिनी तसेच अन्य सहाजण संपर्कात आले होते. त्यामुळे त्या महिलेचा अहवाल आल्यानंतर लगेचच त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. शिवाय त्या महिलेचे वास्तव्य ज्या घरात होते, तेथील 100 मीटर परीसर कन्टेनमेंट झोन करण्यात आला होता. विना परवाना कर्नाटकात म्हणजेच बेळगावात प्रवेश केल्याबद्दल त्या महिलेचा पती, भाऊ व कार चालकाच्या विरोधात एपीएमसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. ती महिला कुटुंबियांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भिती होती. पण आता त्या सर्वांचेच अहवाल निगेटीव्ह आल्याने कुटुंबियांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

बेळगाव शहरात कॅंप, आझाद गल्ली, आस्मा कॉलनी व अमननगर या ठिकाणी कंटेनमेंट झोन होते. या ठिकाणचे कोरोना बाधीत बरे होवून घरी गेल्यामुळे ते झोन रद्द करण्यात आले आहेत. बेळगाव शहर कंटेनमेंट झोनमुक्त होण्याच्या मार्गावर असतानाच सदाशिवनगर येथे कोरोना रूग्ण आढळला व तेथे नवा झोन तयार करावा लागला. पण आता येत्या काही दिवसात तो झोनही रद्द होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Latest Marathi News Update : शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

Social Media Addictive Features: ‘सोशल मीडिया’वर नियंत्रण शक्य? वापर कमी करण्यासाठी उपाय हवेत : उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT