Ten of the Tablig jamat are in Kolhapur say collector  
कोल्हापूर

"तबलीग जमाती'तील दहा जण कोल्हापुरात ; पोलिसांनी घेतला शोध 

सुनील पाटील

कोल्हापूर : दिल्लीतील हजरत निजामुद्दीन भागात असलेल्या तबलीग जमात या धार्मिक संस्थेच्या कार्यक्रमातील कोल्हापूरमधील 19 जणांचा समावेश आहे. यापैकी 9 व्यक्ती बाहेरील राज्यात आहेत. तर, दहा व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यात आल्या असून जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.

केंद्र सरकारने कोरोनाबाबत जाहीर केलेली संचारबंदी डावलून दिल्लीतील हजरत निजामुद्दीन या गजबजलेल्या ठिकाणी "तबलीग जमात' या धार्मिक संस्थेने नवी दिल्लीतील मरकझ इमारतीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील मुस्लिम लोकांनी हजेरी लावली होती. यामध्ये कोल्हापुरातील 21 जणांचा समावेश असल्याची यादी व्हायरल झाली होती. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, केंद्र सरकारकडून काल दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील काही व्यक्तिंनी भाग घेतला अशी माहिती व यादी आली होती. अशी 21 जणांची यादी आली होती. पण प्रत्यक्ष 19 जणांचा सहभाग होता. या सर्व व्यक्तिंचा शोध जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने लावलेला आहे. 19 पैकी 9 जण दिल्ली, हरयाणा येथे आहेत. तर उर्वरित 10 जण कोल्हापुरात आले आहेत. त्या दहाही लोकांशी बोलण झालेले आहे. त्या सर्वांना संस्थात्मक क्‍वॉरंटाईन केले आहे. या सर्वांची अत्यावश्‍यक सर्व तपासणी केली जाईल. तसेच, त्यांना चौदा दिवस जिल्हा प्रशासनाच्या निगराणीखाली ठेवले जाईल. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नका, असे आवाहनही देसाई यांनी केले. 

बाहेरील 70 हजार लोक कोल्हापूरमध्ये 
कोल्हापुरात बाहेरील जिल्ह्यातून व परदेशातून आलेल्या लोकांवर लक्ष ठेवले जात आहे. प्रभाग समिती व ग्राम समितीमार्फत लक्ष ठेवले आहे. त्यांचा वैयक्तिक माहिती घेतली जात आहे. त्यांना दररोज तपासणी केली जात आहे. त्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ सीपीआरमध्ये उपचार केले जात असल्याचेही श्री देसाई यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

अग्रलेख : पाणी वाहते झाले...

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात १५ मिनिटांत बनवा ओट्स अन् एग ऑमलेट,सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT