कोल्हापूर

दहावीच्या विद्यार्थ्यांचा पोलिस, सैन्यदलाकडे कल

प्रतिनिधी

कोल्हापूर  ः दहावीनंतर काय होणार तर साहजिकच प्रतिक्रिया येते की वैद्यकीय क्षेत्रात जाणार अथवा अभियंता होणार. यावर्षी दहावीच्या कलचाचणीत निकालात मात्र 20 टक्के विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या पारंपरिक वाटांना थोडे बाजूला ठेवल्याचे दिसते. गणवेशधारी अर्थात कुणाला लष्करात, तर कुणाला पोलिस दलात भरती व्हायचे आहे. 
कलचाचणी तसेच कल अभिक्षमता चाचणीचा निकाल शुक्रवारी (ता. 1) जाहीर झाला. राज्यातील 22 हजार 478 शाळांतून 15 लाख 76 हजार 926 विद्यार्थ्याची ऑनलाईन चाचणी झाली. यातील 20 टक्के विद्यार्थ्यांनी पहिले प्राधान्यक्रम गणवेशधारी सेवेसाठी दिले आहे. 19.3 टक्के विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवेला पसंती दिली. 17.7 टक्के विद्यार्थ्यांनी ललितकला या क्षेत्राला पहिले प्राधान्य दिले आहे. 19.8 टक्के मुलींनीही याच क्षेत्राला प्राधान्य दिले. 16.8 टक्के विद्यार्थ्यांनी वाणिज्य क्षेत्राला दुसरा प्राधान्यक्रम दिला आहे. 16.1 टक्के मुलींनी तांत्रिक, 16 टक्के मुलींनी वाणिज्य क्षेत्राला दुसरे प्राधान्य दिले आहे. 
राज्यातील नऊही विभागीय मंडळांपैकी सहा विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवेलाचा प्राधान्य दिले. ललित कला विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. नऊपैकी आठ विभागांत वाणिज्य क्षेत्राला दुसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य दिले गेले. काळाच्या ओघात नोकरी-व्यवसायाचे प्राधान्यक्रम जसे बदलत गेले, तसा विद्यार्थ्यांचा कल बदलल्याचे निकालावरून स्पष्ट होते. पुस्तकी ज्ञान मिळविताना अंगभूत गुणांना वाव मिळावा, यासाठी कल जाणून घेण्यासाठी कलमापन चाचणीबरोबर अभिक्षमता चाचणी घेतली जाते. भाषिक, तार्किक, अवकाशीय, सांख्यिकीय अशा क्षमतांवर चाचणी घेतली गेली. 


चाकोरीबाहेरचे करिअर 
दहावीनंतर लष्करात अथवा पोलिस दलात भरती होतो, असे अपवादानेच कानी पडले असेल. विद्यार्थ्यांना हिच सेवा खात्रीची वाटू लागली आहे. दहावीनंतर विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती दिली जायची. अर्थकारणाचे महत्त्व जसे समजू लागले, तसे याच क्षेत्रात करिअर करणे योग्य होईल, असा विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसते. ललितकला अर्थात नाटक, संगीत, अभिनय, ललित लेखन याकडे त्यांचा कल वाढला आहे. विद्यार्थी चाकोरीबाहेरच्या करिअरचा विचार करीत असल्याचे या चाचणीतून आढळून आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik ICU Scam : कोट्यवधींचा अपहार भोवला! नाशिक जिल्हा रुग्णालय आयसीयू घोटाळ्यातील मुख्य आरोपी न्यायालयीन कोठडीत

Latest Marathi Live Update : पुणे येरवड्यात भरधाव टेम्पोचा कहर; अनेक वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

IND vs NZ, 3rd ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस! भारताच्या Playing XI मध्ये अर्शदीप सिंगचे पुनरागमन, मग कोणाला मिळाला डच्चू?

चैतन्य आणि प्रियाची ऑफस्क्रीन धमाल! दुनियादारी’ सीनचं भन्नाट रिक्रिएशन, बॅकग्राऊंड गाण्याला सायली-अश्विनची साथ

Asaduddin Owaisi: मला विचारल्याशिवाय निर्णय घेऊ नका: खासदार असदुद्दीन ओवेसी, एमआयएमच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक पक्षासोबतच राहतील!

SCROLL FOR NEXT