Tenth Twelfth Annual Examination will be delayed by two months in belgaum 
कोल्हापूर

यंदा दहावी, बारावीची वार्षिक परीक्षा दोन महिने उशीराच

मिलिंद देसाई

बेळगाव : कोरोनामुळे शाळा सुरु होण्यास अधिक विलंब झाला आहे. त्यामुळे दहावी व बारावीची परीक्षा मार्च व एप्रिल महिन्यात घेणे शक्‍य नसल्याचे मत परीक्षा मंडळाने व्यक्‍त केले आहे. त्यामुळे 2020-21 च्या शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावीची वार्षिक परीक्षा मे किंवा जुन महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. 
दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरु होतात त्यामुळे शैक्षणिक वर्षाचे योग्य प्रकारे नियोजन करता येते. त्यामुळे शिक्षण खात्याकडुनही चाचणी परीक्षांसह सहामाही व वार्षिक परीक्षेचे शाळा सुरु झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर केले जाते.

दरवर्षी मार्च महिन्यात बारावी तर मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्‌यात दहावीची वार्षिक परीक्षा पार पडते. त्यामुळे विद्यार्थ्याना परीक्षांना सामोरे जाताना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळतो. मात्र यावेळी कोरोनाच्या संकटामुळे अर्धे शैक्षणिक वर्ष पुर्ण झाले तरी अद्याप शाळा सुरु झालेल्या नाहीत. तसेच शिक्षण खात्याने अभ्यासक्रमात 30 ते 40 टक्‍कांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत वेळेत परीक्षा घेणे शक्‍य नसल्याची जाणीव शिक्षण खात्यालाही झाली आहे. त्यामुळे मार्च व एप्रिल महिन्यात परीक्षा, घेणे शक्‍य नसल्याचे मत शिक्षण खात्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांमधुन व्यक्‍त होत आहे. 


दहावी व बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे या परीक्षेत चांगले गुण मिळावेत याकडे प्रत्येक विद्यार्थ्याचे लक्ष असते. मात्र यावेळी शाळा वेळेत सुरु न झाल्याचा सर्वाधिक फटका दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना बसला आहे. बोर्डाची परीक्षा असल्याने किमान 50 टक्‍के अभ्यासक्रम तरी विद्यार्थ्यांना शिकविला पाहीजे तरच विद्यार्थी चांगल्या प्रकारे देऊ शकतील अन्यथा विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण होऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या दिवसात शाळा वेळेत सुरु झाल्या नाही तर परीक्षा मार्च - एप्रिल ऐवजी मे किंवा जुन महिन्यात घ्याव्या लागणार आहेत. 

शिक्षण खात्याकडुन सध्या शाळा कधी पासुन सुरु करता याकडे लक्ष देण्यात आले आहे. येणाऱ्या दिवसात लवकर शाळा सुरु झाल्या तर परीक्षा वेळेत घेता येतील अन्यथा परीक्षांना विलंब होऊ शकतो कोरोनाचे संकट किती दिवसात कमी होते यावर बरेच काही अवलंबुन आहे. 
अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT