Tenth twelfth exams will not be held in March 
कोल्हापूर

दहावी-बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात होणार नाहीत  

मिलिंद देसाई

बेळगाव : शिक्षण खात्याने मार्च महिन्यात दहावी व बारावीची परीक्षा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर झाला आहे. तसेच वार्षिक परीक्षांच्या वेळा पत्रकानुसार अभ्यासक्रमात कपात केली जाणार आहे. अशी माहितीही देण्यात आली आहे. 


शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्यासाठी शिक्षण खात्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच बैठक बोलाविली जाणार आहे. त्यावेळी दहावी व बारावीची परीक्षांचे वेळापत्रकासह पुढील शैक्षणिक वर्ष कोणत्या महिन्यापासून सुरु करावे याबाबतचा अंतीम निर्णय घेतला जाणार आहे. तसेच अभ्यासक्रमात कपात करण्यात आल्याबाबत माहिती देण्याची मागणी राज्यभरातून होऊ लागली आहे. मात्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर किती दिवस शाळा सुरु राहील त्याचा विचार करुन अभ्यासक्रमाचे नियोजन केले जाणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्‌यात बारावी तर शेवटच्या आठवड्‌यात दहावीच्या परीक्षेला सुरुवात होते. परंतु यावेळी शैक्षणिक वर्ष सुरु न झाल्याने परीक्षा मार्च महिन्यात घेणे शक्‍य होणार नाही. तरीही परीक्षा केंव्हा होणार याची चिंता विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने लवकर वेळापत्रक जाहीर केल्यास विद्यार्थ्यावरील ताण कमी होणार आहे. एक जानेवारीपासून दहावी व बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. त्यानंतर वेळापत्रक जाहीर होण्याची शक्‍यता आहे. मात्र विद्यार्थ्यांनी वेळापत्रक कधी जाहीर होणार याची काळजी न करता अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक आहे. 

 कोरोना संकट काळात खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळांना मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे खाजगी शाळांनी बंद पुकारत विविध मागण्या केल्या आहेत. मात्र खाजगी शाळांना अनदुान देणे सरकारला शक्‍य होणार नसल्याची माहिती शिक्षण मंत्र्यानी दिली आहे. तसेच खासगी शाळा व पालक यांनी सामंजस्यपणाने प्रवेश शुल्काबाबत तोडगा काढावा असे त्यांनी सांगितले आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT