Tenth twelfth grade plan maintained education marathi news 
कोल्हापूर

मुलांनो लागा तयारीला ; एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणांचा आराखडा कायम 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  कोरोनामुळे गेल्या वर्षी दहावी- बारावीच्या परीक्षेचे गणित विस्कळित झाले होते. लॉकडाउनच्या काळात पेपर तपासणी करताना राज्य मंडळाला मोठी कसरत करावी लागली होती. दोन्ही परीक्षेच्या अभ्याक्रमात थोडी कपात झाली तरी गुणांच्या आराखड्यात कोणताही बदल झालेला नाही. प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. या परीक्षाही पूर्वीप्रमाणेच होतील. 

प्रारंभी ऑनलाईन, नंतर ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू झाल्या. बारावीची परीक्षा दर वर्षी फेब्रुवारीत होते. मार्चमध्ये दहावीच्या परीक्षेस प्रारंभ होतो. या वर्षी दोन्ही परीक्षा पुढे गेल्या आहेत. दरवर्षी डिसेंबरमध्ये दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम पूर्ण होतो. 

 मात्र  एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणांच्या आराखड्यात कोणताही बदल होणार नसल्याचे विभागीय मंडळाच्या सूत्रांनी आज "सकाळ'ला सांगितले. लेखी परीक्षा 100 गुणांचीच होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

यावर्षी शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये उशिरा सुरू झाली. ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविताना ज्या भागात मोबाईला रेंज नव्हती, तेथे अडचणी निर्माण झाल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुणांकन कमी होईल का, अशी शंका होती. बारावीच्या परीक्षेस 23 एप्रिलपासून, तर दहावीच्या परीक्षेस 29 एप्रिलपासून सुरवात होत आहे. शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाल्यावर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर सध्या शिक्षक व प्राध्यापकांचा भर आहे. कोल्हापूर विभागातून दहावीच्या परीक्षेस सुमारे दीड लाख विद्यार्थी दरवर्षी सामोरे जातात. 

कोणताही बदल नाही; परीक्षा 100 गुणांचीच होणार 


दहावी, बारावीच्या गुणांच्या आराखड्यात कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणे 100 गुणांची परीक्षा होईल. एकूण अभ्यासक्रमातील 25 टक्के आशय कमी होईल. प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होईल. 
- देवीदास कुलाळ, प्रभारी सचिव, कोल्हापूर विभागीय मंडळ 

संपादन- अर्चना बनगे


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT