Uddhav Thackeray vs Eknath Shinde esakal
कोल्हापूर

Whatsapp स्टेटस्‌ला रिप्लाय दिला म्हणून ठाकरेंच्या शहरप्रमुखांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण

कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) शिवसेनेत (Shiv Sena) मुरलीधर जाधव प्रवेश करणार असल्याचे स्टेटस्‌ ठेवले होते.

सकाळ डिजिटल टीम

जाधव व स्टेटस्‌ ठेवणारे कार्यकर्ते यांच्यात व्हाॅट्सअॅप वादावादी झाली. त्यानंतर काही तरुणांनी अण्णा जाधव यांना मारहाण केली.

पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Balasaheb Thackeray Group) शहर प्रमुख आण्णासो जाधव यांना स्टेटस्‌वरील रिप्लाय (Whatsapp Status) दिल्याच्या कारणाने मारहाण झाली. याबाबत रात्री उशिरापर्यंत हुपरी पोलिस ठाण्यात (Hupari Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचे पट्टणकोडोलीतीलच (Pattankodoli) कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) शिवसेनेत (Shiv Sena) मुरलीधर जाधव प्रवेश करणार असल्याचे स्टेटस्‌ ठेवले होते. यावरून जाधव व स्टेटस्‌ ठेवणारे कार्यकर्ते यांच्यात व्हाॅट्सअॅप वादावादी झाली. त्यानंतर काही तरुणांनी अण्णा जाधव यांना मारहाण केली.

जाधवांच्या पत्नी-मुलालाही मारहाण

दरम्यान, यात जाधव यांना जबर मार लागला. त्यांच्या पत्नी व मुलालाही मारहाण झाल्याचे समजते. त्यांनी हुपरी पोलिस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. यासंदर्भात गावात तणावपूर्ण शांतता आहे. राम्माण्णा यांच्यासह सहा ते सात जणांवर गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT