कोल्हापूर

शेळोशी-पखालेवाडी बंधाऱ्याची उंची वाढवावी

CD

01767

शेळोशी-पखालेवाडी
बंधाऱ्याची उंची वाढवावी

गगनबावडा, ता. १५ : पाणी अडविणे व वाहतूक अशा दुहेरी हेतूने उपयोग होण्याच्या दृष्टीने धामणी नदीवर बांधकाम सुरू असलेल्या शेळोशी-पखालेवाडी दरम्यानच्या बंधाऱ्याची उंची वाढवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
शेतीला पाणी अडविण्याच्या दृष्टीने धामणी नदीवर पूर्वीचे काही बंधारे आहेत. पण ते सध्या जीर्ण झाले आहेत. ते बंधारे असूनही येथील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मातीचे बंधारे घालावे लागतात. दरम्यान पाटबंधारे विभागातर्फे धामणी नदीवर नव्याने काही ठिकाणी बंधारे बांधणे सुरू आहे. कडवे-गारीवडे दरम्यान दोन वर्षांपूर्वी बंधारा बांधला आहे. नदीपात्रापेक्षा त्याची उंची कमी आहे. पावसाळ्यात हे बंधारे पाण्याखाली जातात. त्यावरून दुचाकीही वाहतूक करता येत नाही. पाणी अडविण्याव्यतिरिक्त त्याचा फारसा उपयोग होत नाही. गेल्या महिन्यापासून शेळोशी, डोंगळेवाडी ते पखालेवाडीदरम्यान धामणी नदीवर बंधाऱ्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्यामुळे गगनबावडा व राधानगरी तालुक्यांदरम्यानची वाहतूक सुरळीत होणार आहे. पावसाळ्यात बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे कोनोली, पाटीलवाडी, कुपलेवाडी, कडवे, जरगी, म्हालदारवाडी, शेलारवाडी, शेळोशी इत्यादी गावांचा संपर्क तुटतो. पाणी अडविणे व वाहतूक अशा दुहेरी हेतूने बंधाऱ्याची पुरेशी उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्धार; जीएमआरटीकडून अडथळा नसल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा

भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

SCROLL FOR NEXT