कोल्हापूर

Bitcoin Fraud: बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत २२ लाखांना गंडा, प्रचंड नफ्याचं दाखवलं होतं अमिष

बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवतो आणि प्रचंड नफा मिळवून देतो, असे सांगून २२ लाख १० हजार रुपयांचे धनादेश स्वतःसह वडील आणि पत्नीच्या खात्यात वटवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

CD

Bitcoin Fraud case: बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवतो आणि प्रचंड नफा मिळवून देतो, असे सांगून २२ लाख १० हजार रुपयांचे धनादेश स्वतःसह वडील आणि पत्नीच्या खात्यात वटवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी स्वप्नील गजानन माताडे (वय ४८), गजानन यशवंत माताडे (वय ७०), रश्मी स्वप्नील माताडे (वय ४५, सर्व रा. बी १, बी २ यशवंत बंगला, केवीज पार्क, नागाळा पार्क) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद वसंत निवृत्ती कांबळे (रा.ए/२, ६०७, इंद्रलोक स्वामी देवप्रकाश गार्डन, मोहनपूरमजवळ अंबरनाथ, पूर्व मुंबई) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत कांबळे हे निवृत्त कर्मचारी असून, अमित माने यांच्याद्वारे त्यांची स्वप्नील माताडे याच्याशी ओळख झाली. स्वप्नीलने वसंत कांबळे यांचा विश्वास संपादन केला. ‘मी क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवतो. तुम्हीपण गुंतवा. बिटकॉईन हे परकीय चलन आहे. यामध्ये नफा मोठा मिळतो,’ असे त्याने कांबळे यांना सांगितले.

त्यानंतर त्याने २२ लाख १० हजार रुपयांचे ९ चेक घेतले. हे चेक त्याने स्वतःच्या तसेच वडील गजानन माताडे आणि पत्नी रश्मी माताडे यांच्या खात्यात वटवले. वसंत कांबळे यांना याची कल्पना आली. त्यांनी स्वप्नील याच्या घरी जाऊन त्याच्या वडील आणि पत्नीच्या खात्यावर जमा झालेले पैसे परत मागितले, मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे वसंत कांबळे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT