समरजितसिंह घाटगे sakal
कोल्हापूर

एकरकमी एफआरपी हा ‘शाहू पॅटर्न ; समरजितसिंह घाटगे

शाहू कारखान्याचा गळीत हंगामाचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

कागल : ‘शाहू साखर कारखान्यात कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी लोकहिताच्या निर्णयांना नेहमीच प्राधान्य दिले. त्यासाठी व्यक्तिगत नुकसान सोसले, पण कारखाना व शेतकरी हितासाठी तडजोड केली नाही. त्यांचे हे धोरण राज्यभर "शाहू पॅटर्न" म्हणून नावाजले गेले. यावर्षी शेतकरी अडचणीत असताना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय हा याच पॅटर्नचा एक भाग आहे,’ असे प्रतिपादन शाहू कारखान्याचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.शाहू साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

श्री. घाटगे म्हणाले, ‘आज सर्वत्र शाहू पॅटर्न यशस्वी म्हणून नावाजला जातो, मात्र त्यासाठी स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कष्ट घेतले आहेत. प्रसंगी कटू निर्णय घेतले त्यांना सर्व सभासद शेतकरी बांधवांनी साथ दिली. त्यामुळे हा पॅटर्न नावारूपास आला आहे. शाहू पॅटर्नमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेऊ शकलो. हा निर्णय कुणाला त्रास देण्यासाठी किंवा अडचणीत आणण्यासाठी नाही तर अडचणीतीत शेतकऱ्यांसाठी घेतला आहे.’

यावेळी संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी गव्हाण पूजा वीरकुमार पाटील व त्यांच्या पत्नी आशाराणी, केनयार्ड विभागात मारुती निगवे व त्यांच्या पत्नी भारती व काटापूजन पी. डी. चौगुले व त्यांच्या पत्नी हौसाबाई यांनी केले. उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. सचिन मगदूम यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा एकाच दिवशी दोन परीक्षा, निवडणुकीमुळे MPSCने परीक्षेची तारीख बदलल्यानंतरही गोंधळ

Labourer wins lottery : मजुराने जिंकली १.५ कोटींची लॉटरी पण उभ राहिलं नवं संकट, घर सोडून अख्खं कुटुंबच गायब, नेमकं काय घडलं?

बळीराजासाठी जगण्यापेक्षा मरण बरं! विदर्भात ४ हजार शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक आकडेवारी समोर, सरकार कधी गंभीर होणार?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी आज एकाच बैठकीत, काय आहे कारण?

Tiger Relocation Chandoli : चांदोली जंगलात आणखी एका वाघीणीची एन्ट्री; ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत ताडोबाची दुसरी मादी दाखल, Video

SCROLL FOR NEXT