कोल्हापूर

ट्रक पलटला

CD

08755
इचलकरंजी : रद्दीने भरलेला ट्रक पंचगंगा नदीकाठावर लहान पुलावर शिवनाकवाडी मार्गावर पलटला.

पंचगंगा पूलावर
भरधाव ट्रकची पलटी

शिवनाकवाडी मार्गावर अपघात

इचलकरंजी, ता.२३ : ओव्हरलोड रद्दी भरून जाणारा भरधाव ट्रकची पंचगंगा नदीकाठावर लहान पुलावरील शिवनाकवाडी मार्गावर वळसा घालताना पलटी झाला. चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरच ट्रक कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना बुधवारी (ता.२२) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर रेंदाळ - रांगोळी मार्गावर अनेकांना ठोकरत आलेला ट्रकचालक काही काळ केबिनमध्ये भीतीने लपून बसला.
घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी, हुपरी मार्गावरून ओव्हरलोड रद्दीने भरलेला ट्रक ( टी.एन.५६ एफ ६०८९) इचलकरंजीकडे येत होता. दरम्यान या ट्रकचालकाने येताना रेंदाळ-रांगोळी मार्गावर काही दुचाकी वाहनांना ठोकरले. त्यानंतर भरधाव ट्रकला काही तरुणांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रक सुसाट पुढे निघाला. त्यानंतर तरुणानी दुचाकीवरून या ट्रकचा पाठलाग सुरू केला. दरम्यान येथील पंचगंगा नदी घाटावरील लहान पुल मार्गाला वळसा घालून शिवनाकवाडीकडे जाताना ट्रक चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला. रात्रीच्या वेळेस पाऊस पडल्यामुळे मार्गावर वाहनांची वर्दळ कमी होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही.
घटनेनंतर मार्गावर वाहतूक तासभर ठप्प झाली होती. घटनास्थळी गावभाग पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. भीतीने ट्रक चालक केबिनमध्ये लपून बसला होता. त्याला सावधपणे नागरिकांनी बाहेर काढले. त्यावेळी तो दारूचा नशेत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही घटना कुरुंदवाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने याबाबतची पुढील माहिती कुरुंदवाड पोलिस ठाण्याला देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT