कोल्हापूर

तुळशी धरण 90 टक्के भरले! दुपारपर्यंत धरण ओसंडून वाहण्याची शक्यता

राजू पाटील : सकाळ वृत्तसेवा

धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर किती स्वयंचलित दरवाजे खुले होणार याचे गणित अवलंबून आहे.

राधानगरी(कोल्हापूर): राधानगरी धरणाच्या उच्चतम पाणीपातळीला केवळ अर्धा फूट कमी आहे. आज दुपारपर्यंत ही पातळी पूर्ण होऊन धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर किती स्वयंचलित दरवाजे खुले होणार याचे गणित अवलंबून आहे.

सध्या 347 फूट इतकी पाणीपातळी झाली असून केवळ अर्धा फूट कमी आहे. भोगावती नदी अद्यापही धोक्याच्या पातळीच्या वरुनच वाहत आहे. गेल्या दोन दिवसाची उघडीप असूनही भोगावतीचे महापुराचे पाणी स्थिर असल्याने येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

राधानगरी तालुक्यात पाऊस बऱ्यापैकी शांत झाला असला तरी भोगावती नदीला आलेला महापूर अद्याप ओसरलेला नाही. याचे पाणी नदीपात्रा पेक्षा खूप दूरवर पसरले आहे. गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अपेक्षेप्रमाणे नदीचे पाणी कमी होताना दिसत नाही. दोन दिवसात केवळ तीन फूट पाणी उभे कमी झाल्याने नदी तीरावरील पिके धोक्यात आली आहेत. अशातच आज धरण भरल्यानंतर होणारा विसर्ग व किती प्रमाणात असेल यावर महापुराची तिव्रता अवलंबून आहे.

आज दुपारपर्यंत धरण ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. जर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अचानक वाढला आणि स्वयंचलित सर्व दरवाजे खुले झाले तर धोका निर्माण होण्याची भीती आहे. मात्र सध्यस्थितीत पाऊस मर्यादित असल्याने एखाद दुसरा दरवाजा खुला होईल अशी स्थिती आहे. तुळशी धरण ९० टक्के भरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Red Alert: नाशिकला रेड अलर्ट; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सप्तशृंगी गड व नांदुरी घाट मार्ग ७ ते ९ जुलैपर्यंत भाविकांसाठी बंद

Junnar Rains : जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाने धरणसाठा वाढला; अलदरेतील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Pune Mula-Mutha flood : मुळा-मुठा नदीला पूर; कोरेगाव मुळ येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

India T20I Squad: भारताचा T20I संघ जाहीर! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजू सॅमसनला डच्चू, तर रिंकू सिंगचे पुनरागमन

Raigad Flood : रायगडमध्ये मुसळधार पावसाने कहर; सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्या धोक्यापलीकडे, जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT