Theft of 18 ounces of gold in kolhapur ujalaiwadi 
कोल्हापूर

हळदी समारंभातून १८ तोळ्यांच्या सोन्याची चोरी

सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी - कणेरीवाडी (ता. करवीर) येथील हॉटेल पार्क इन येथे लग्नाच्या हळदी समारंभ कार्यक्रमा दरम्यान ४२ ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा हार, २५ ग्रॅम वजनाचा एक हार, ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 42 ग्राम वजनाचा एक सोन्याचा बाजूबंद, सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, रोख रक्कम, दोन महागडे मोबाईल व सिम कार्ड असा सुमारे पाच लाख ५९ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 

 या बाबतची फिर्याद पुणे येथे राहणाऱ्या विनीत कुटुंबीयांनी याबाबत गोकुळ शिरगाव पोलिसात वर्दी दिली आहे.
 विनीत कुटुंबीय लग्नाच्या हळदी समारंभात्याच्या आधारे पोलिस अधिक तपास करीत आहेत. लॉनमधील टेबलवरील पर्समध्ये ठेवलेल्या ऐवजसह पर्सही लंपास करीत चोरट्याने पोबारा केला. चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आर. डी. गच्चे करीत आहेत.

हॉटेलमध्ये चोरीचे वाढते प्रमाण

गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. असून हॉटेलमधून चोरी होण्याची अलीकडच्या काळातील ही दुसरी घटना असून मागील महिन्यात मेंढ्या खरेदीसाठी जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाडीतून  जय हिंद हॉटेलमध्ये थांबले असता चोरी झाली होती. त्यानंतर आता पार्क इन हॉटेलमध्येही चोरी झाली असून यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.
 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Vivo X Fold 6 ची भारतात एन्ट्री! 'या' दिवशी होणार लाँच; 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स!

Badminton Association: महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण लखानी

SCROLL FOR NEXT