theft of two lakh items in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर : वडणगेत खिडकीचे गड उचकटून सव्वादोन लाखांच्या दागिन्यांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - वडणगे (ता. करवीर) येथील बंद घराच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्याने आत प्रवेश केला. त्याने घरातील साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचा ऐवजासह रोकड असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद अनिल राजाराम सादुले (वय 55, रा. उत्तरेश्‍वर पेठ) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, अनिल सादुले हे वडणगे येथे राहत असून किराणा व्यवसाय करतात. त्यांचे उत्तरेश्‍वर पेठेतही घर आहे. दिवाळी सणासाठी ते कुटुंबासोबत 21 नोव्हेंबरला उत्तरेश्‍वर येथील घरी गेले होते. दरम्यान चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज उचकटून आत प्रवेश केला. घरातील बेडरूमधील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून त्यातील 14 हजार 500 रूपयांची रोकड, अडीच तोळे वजनाची दोन सोन्याची चेन, अर्धा तोळ्याचे लॉकेट, 15 ग्रॅमचे तीन वळे, 15 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 12 ग्रॅमची दोन नाणी, 4 ग्रॅमचे डुलसह 200 ग्रॅमच्या चांदीच्या समई, मूर्ती, 50 ग्रॅमची समई, 200 ग्रॅमचे ताट, 50 ग्रॅमचा ग्लास, 50 ग्रॅमचे तबक, 200 ग्रॅम निरंजनासह 150 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 14 हजार 500 रूपयांचा ऐवज लंपास केला.

सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सादुले यांनी याची माहिती करवीर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आज याबाबतची फिर्याद सादुले यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला. 

 
संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

Madhya Pradesh: वर्षभरात ८५ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी; ६२ खनिज निरीक्षकांना नियुक्तीपत्रे

'हे काय चाललंय आयुष्यात...' जितेंद्र जोशींनी नम्रता शिरोडकरबरोबरच्या कामाचा सांगितला अनुभव, म्हणाले, 'एक वेगळच दडपण...'

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

IND vs SL Semi Final : झाला हो गाजावाजा,पण...! भारताची आघाडीची फळी ढेपाळली; वैभव सूर्यवंशी ठिक खेळला, संजू-अभिषेक फेल

SCROLL FOR NEXT