then number of women increased in gram panchayat election in jaysingpur kolhapur 
कोल्हापूर

यंदा गावांत रणधुमाळी होणार ; महिला कारभाऱ्यांची संख्या वाढणार

गणेश शिंदे

जयसिंगपूर (कोल्हापूर) : शिरोळ तालुक्‍यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला गावागावांत वेग आला आहे. निवडणूक जाहीर झालेल्या ३३ पैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर महिला कारभाऱ्यांना संधी मिळणार आहे. 

सरपंचपद सदस्यांमधून निवडले जाणार असल्याने गावोगावी पॅनेल टू पॅनेल सामना रंगणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या. तात्पुत्या काळासाठी शासनाने अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती खरी; पण प्रभारी सरपंचांचा तालुक्‍यावर ठिय्या असल्याने गावकऱ्यांची गैरसोय झाली. शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे आता हक्काचा सरपंच मिळणार आहे.

जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात राहिल्यास यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरील सत्ताही मिळविणे सोपे होते. शिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीनेही ग्रामपंचायतींवर वर्चस्व गरजेचे असल्याने गावपातळीपासून तालुका आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांनी कंबर कसली आहे. येणाऱ्या काळातील निवडणुकांचा विचार करता आतापासूनच नेत्यांची रंगीत तालीम या निवडणुकीतून पाहायला मिळेल. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य पक्षांनी तालुक्‍याची पकड मजबूत करण्यासाठी तालुक्‍याच्या ३३ ग्रामपंचायतींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 


..तर उपसरपंचपदावर डोळा 

सरपंचपदाच्या आरक्षणात संधी मिळाली नाही तर उपसरपंचपदाचीही तयारी केली जात आहे. गावपातळीवर वजनदार पदासाठी स्थानिक नेत्यांनी त्यापद्धतीची व्यूहरचना सुरू केली आहे. सरपंचपदाची तयारी करणाऱ्यांच्या पदरी निराशा आलीच तर मात्र दुसऱ्या क्रमांकाच्या पदासाठी चुरस रंगणार आहे. 

या गावांत होणार रणधुमाळी 

अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, नृसिंहवाडी, गौरवाड, शिरटी, हसूर, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, कवठेगुलंद, बस्तवाड, तेरवाड, मजरेवाडी, जुने दानवाड, घोसरवाड, टाकळीवाडी, शिरढोण, यड्राव, शिरदवाड, निमशिरगाव, तमदलगे, चिपरी,  जैनापूर, दानोळी, कोथळी, दत्तवाड, बुबनाळ, कोंडिग्रे, नांदणी, धरणगुत्ती, जांभळी, उदगाव. 

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूने फुंकले रणशिंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT