There Is Less Rain In Ajara This Year Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजऱ्यात यंदा पावसाचे मीटर डाऊन, गाडे अडले 'एवढ्या' मिली मीटरवर

रणजित कालेकर

आजरा : गतवर्षी धुवॉंधार कोसळलेल्या पावसाने यंदा मात्र शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळवले आहे. जून महिन्यात दमदार सुरवात केलेल्या पावसाने हुलकावणी देण्यास सुरवात केली आहे. माळरानावरील पिक अडचणीत आली असून अंतिम टप्प्यातील भात रोपा खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा असून 965 मिली मिटरवर गेले पाच सहा दिवस पावसाचे मीटर अडकले आहे. एकंदर यंदा पावसाची "दमछाक' झाली आहे. 

आजरेकरांना पाऊस तसा नवा नाही. पावसाळ्यात तालुक्‍यात धुवॉंधार पाऊस कोसळतो. पावसामुळे घरा बाहेर पडणेही मुश्‍कील होते. गतवर्षी तालुक्‍यात अतिवृष्टी झाली. तालुक्‍यात सरासरी 3600 मिमी पाऊस झाला. हिरण्यकेशी व चित्रा नदीला महापुर आला. तालुक्‍यातील आठ गावे पाण्याखाली गेली होती. शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे चित्र आजही डोळ्यासमोर उभारले, तर अंगावर काटा येतो. पण यंदा मात्र उलटे चित्र दिसत आहे.

पावसाने हुलकावणी देण्याचा खेळच तालुक्‍यात सुरू केला आहे. तालुक्‍यात आजअखेर 965 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. गेले पाच सहा दिवस पावसाने हुलकावणी दिल्याने त्याला एक हजार मिलीमिटरचा आकडा पार करता आला नाही. पाऊस नसल्याने तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील अंतिम टप्प्यात असलेले रोप लावणीचे काम खोळंबले आहे. माळरानावरील भात, भुईमूग व नागली पिक अडचणीत आली आहेत. सध्या "पुष्य' नक्षत्र सुरू झाले आहे. या नक्षत्रात जोरदार पाऊस पडतो. पण पुष्य नक्षत्राचे सुरवातीचे दिवसच कोरडे गेले आहेत. शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा लागून राहीली आहे. 

पावसाच्या गावातही हुलकावणी 
पावसाचे गाव व प्रतिचेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किटवडे या गावात गेले पाच सहा दिवस पावसाने हुलकावणी दिली आहे. गेले दोन दिवस कोरडे गेले असल्याचे किटवडे येथील पाऊस मापन केंद्राचे प्रमुख आर. डी. सावंत यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT