Home 
कोल्हापूर

कोल्हापूर : खातेफोड नसल्याने परिसराचे एकच कार्ड

विकसकाच्या चुकीमुळे मिळकतधारकांना आर्थिक भुर्दंड; कर्ज प्रकरणात अनेक अडचणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विकसकाने जागा विकसित केली, तेथे घरे बांधली, ग्राहकांनी ती विकत घेतली मात्र त्याची खाते फोड न झाल्याने त्या परिसरातील सर्व मिळकतींचे एकच प्रॉपर्टीकार्ड (Propertycard) तयार झाले. स्वतःच्या मिळकतीचा तपशील देण्यासाठी जे प्रॉपर्टीकार्ड काढले जाते त्यावर सर्वांचीच नावे आणि मिळकतीची माहिती येते. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसतो. शहरात असे सात ते आठ परिसर असे आहेत जेथे ही समस्या आहे.

शहराचा विस्तार झाला तसे आजूबाजूच्या परिसरात नवीन उपनगरे, वसाहती विकसित झाल्या. यावेळी विकसकांनी इमारती, बंगले बांधले. पुढे त्यांच्या सोसायट्या झाल्या. मात्र, विकसकांनी कमी जास्त पत्रक (क.जा.प) न केल्याने तेथे खाते फोड झाली नाही. त्या परिसराचे एकच प्रॉपर्टीकार्ड तयार झाले. या परिसरातील एखाद्या मिळकतधारकाने प्रॉपर्टीकार्डची प्रत काढली, तर त्यावर त्या परिसरातील सर्वच मिळकत धारकांची नावे येतात.

काही ठिकाणी ही संख्या ५०० असते तर काही ठिकाणी ती हजारपर्यंतही जाते. त्या प्रॉपर्टीकार्डवर कोणाची मिळकत किती आहे. त्याचे वारस कोण आहे? क्षेत्र किती आहे? कोणाच्या मिळकतीवर किती कर्ज आहे? ही सर्व व्यक्तिगत माहिती सार्वजनिक होते. याशिवाय बँकांच्या कर्ज प्रकरणात, खरेदी-विक्री व्यवहारात अडसर होतो. खाते फोडीची प्रक्रिया किचकट असली तरी ती करणे क्रमप्राप्त आहे. विकसकाने त्याकाळी ते न केल्याने याचा त्रास होतो.

सोसायटी सभासदांची अडचण

महापालिका हद्दीतील उपनगरात काही सोसायट्या आहेत. त्यांचे प्रॉपर्टीकार्ड नाही, त्यांचा सातबारा आहे. या सातबाऱ्यावर सर्व सभासदांच्या मिळकतीची माहिती आहे. त्यांचा सातबारा रद्द झाला असून अद्याप प्रॉपर्टीकार्डही नाही. मिळकत स्वतःची असूनही हक्क दाखवताना मिळकतधारकांना मनस्ताप होतो.

या परिसरात प्रश्न गंभीर

शिवाजी पार्क, रंकाळा तलावाच्या, पाठीमागील बाजू, टिंबर मार्केट, सोन्या मारुती चौक परिसर, जरगनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT