There Is No Team In Women's Football From Kolhapur Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

महिला फुटबॉलमध्ये कोल्हापूरची पाटी कोरीच

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे (विफा) मुंबईत महिलांच्या राज्यस्तरीय फुटबॉल लीगला सुरवात झाली आहे. कुपरेज मैदानावरील या स्पर्धेत केवळ सातच संघ सहभागी झाले आहेत. दोन वेळच्या विजेत्या कोल्हापूर सिटी एफसीसह रिव्हा एफसीनेही स्पर्धेत दांडी मारल्याने यंदा कोल्हापूरची पाटी कोरीच राहिली आहे. राज्यातील परिस्थितीही वेगळी नाही.

मुंबईच्या सहा, पुण्याच्या चार संघांनीही स्पर्धेतील सहभाग काढून घेतल्याने संघाची संख्या निम्म्याने घटली आहे. कोरोनामुळे संघांनी स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचे सांगितले जात आहे. 
महिला फुटबॉलला चालना देण्याची सूचना फिफा आणि एएफसीने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला केली आहे. त्यामुळे सर्वच राज्य संघटनांनी महिला फुटबॉलच्या प्रसारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विफातर्फे तीन वर्षांपासून राज्यस्तरीय महिला फुटबॉल लीग घेतली जाते. यातील विजेता, उपविजेता संघ इंडियन महिला फुटबॉल लीगसाठी (आय लीग) पात्र ठरतो. 

ऑक्‍टोबर 2019 मध्ये झालेल्या विफा महिला फुटबॉल लीगमध्ये 18 संघ सहभागी झाले होते. यात मुंबईच्या 11, पुण्याच्या चार, कोल्हापूरच्या दोन, तर साताऱ्याच्या एका संघाचा समावेश होता. यंदाच्या स्पर्धेवर कोरोनाचे सावट पडले आहे. नागपूर आणि साताऱ्याचे प्रत्येकी एक, तर मुंबईचे पाच संघ सहभागी आहेत. कोरोनामुळे संघांना बायोबबलमध्ये राहणे सक्तीचे आहे. त्यासाठी आर्थिक ताण संघांवर पडणार आहे. मुळातच पुरस्कर्त्यांचा अभाव असताना आर्थिक भुर्दंड सोसण्यापेक्षा स्पर्धेतून माघार घेतलेलीच बरी अशी भूमिका संघ व्यवस्थापनाची असल्याचे समजते. 

महिला खेळाडू निराश... 
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून क्रीडा क्षेत्र ठप्प आहे. कोणत्याच स्पर्धा नसल्याने खेळाडू हवालदिल झाले आहेत. प्रशासनाच्या जाचक अटींमुळे अधिकृत स्पर्धांच्या आयोजनासाठी संयोजकही थांबले आहेत. त्यातही पुरुषांच्या तुलनेत महिला फुटबॉलपटूंना खेळण्याच्या संधी कमी आहेत. विफाने घेतलेल्या स्पर्धेत धोका नको म्हणून संघांनीच दांडी मारल्याने वर्षभर सराव करणाऱ्या महिला खेळाडूंच्या पदरी निराशा पडली आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT