कोल्हापूर - कोव्हिड आणि चिकन याचा काडीमात्र संबंध नाही. चिकन खाल्ले तर काहीही बिघडत नाही, असे सांगून पोल्ट्री चालकांचा काही दिवसापूर्वी घसा कोरडा होण्याची वेळ आली. पूर्ण वाढ झालेले पक्षी फेकून देण्याची वेळ आली. मात्र काही दिवस सरले तसे मटणही मिळणे बंद झाले आणि चिकनही दुरापास्त झाले. अशा स्थितीत जिभेचे चोचले पुरवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला. आजच्या रविवारचे चित्र मात्र वेगळे होते. मटण सकाळी दहाच्या आतच संपले आणि चिकनचा दर होता तब्बल दोनशे रूपये किलो इतका.
खाद्यपदार्थांच्या बाबतीत तर लोक अधिक जागृत असतात. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव जसा सुरू झाला तसे चिकनकडे पाठ फिरवायला सुरवात केली. जिल्ह्यात, आजरा, चंदगड, पेठवडगाव तसेच करवीर तालुक्यातील काही गावात पोल्ट्री फॉर्म आहेत. अलीकडच्या पाच सात वर्षात तरूण वर्ग मोठ्या प्रमाणावर या व्यवसायाकडे वळला. कोणत्या रोगाचे कोणते संकट येईल आणि व्यवसाय खाली बसेल याचा अंदाज व्यावसायिकांना आला होता. स्वाईन फ्लूच्या संकटावेळीच असेच झाले. त्यावेळी चिकनकडे पाठ फिरविली. नंतर व्यवसाय आहे तसा पुर्वपदावर आला.
कोरोनाचे संकट सुरू झाले आणि बधता बधता पोल्ट्रीचा व्यवसाय उद्धवस्त झाला. लोकांना फुकट कोंबड्या देण्याची वेळ पोल्ट्रीचालकांवर आली. एकावर एक फ्री अशी कोंबडीची ऑफर दिली गेली. दोन कोंबड्या घ्या आणि कापायचे तेवढे पैसे द्या असेही सांगितले गेले. पोल्ट्री व्यवसाय शिल्लक राहतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली. कोरोनाचे संकट दिवसेदिवस गडद होते. गेले. कोण्यापिण्याचे वांदे होत गेले. दर बुधवारी आणि रविवारी मांसाहारी जेवणाची सवय अंगवळणी पडलेली ती तशी सहजासहजी सुटणारी नव्हती.
संचारबंदी लागू झाली. दळणवळणाची साधने थांबली. बकऱ्यांची आवक मंदावली. अमुक एका दरानेच मटण विकले पाहिजे म्हणणारे गायब झाले. आज मटणाचा किलोचा दर सहाशे रूपये किलो पर्यंत पोहचला आहे. तरिही तक्रार करायला कुणी तयार नाही. मटणाच्या दुकानाच्या दारात सकाळपासूनच रांगा लागल्या. दुकानदाराने त्याच्या वाट्याला आलेली दोन ते तीन बकरी कापली आणि दहानंतर दुकाने बंद केली. ज्या ठिकाणी मटण उपल्बध होते ते उन्हाचा तडाखा असूनही लोकांची रांग काही थांबत नव्हती.
आज रविवारची संधी साधून चिकन विक्रेते सकाळीच दुकानात दाखल झाले. प्रत्येकाने किमान ते वीस ते पंचवीस कोंबड्याची ऑर्डर दिली होती. गाडी सकाळीच प्रच्येकाच्या दारातून येऊन गेली, मटणाच्या आग्रहापोटी चिकनही संपून जाईल ते ही मिळायचे नाही यासाठी चिकनच्या दुकानासमोरही गर्दी सुरू झाली. तीन आठवड्यापूर्वी साठ रूपये किलोने दराने चिकन घेणारे आज दोनशे रूपये मोजताना मागे पुढे पाहत नव्हते. दुपारपर्यंत गर्दी कायम होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.