These are the reasons why KMT bus service will remain closed 
कोल्हापूर

केएमटी बससेवा बंदच राहणार कारण ही आहेत कारणे

युवराज पाटील

कोल्हापूर,  ः राज्यात खासगी वाहतूक सुरू झाली तरी केएमटीची सेवा बंदच राहणार आहे. शाळा, महाविद्यालये सुरू होत नाहीत. तोपर्यत केएमटी पूर्णक्षमतेने सुरू होण्याची चिन्हे तुर्तास तरी दिसत नाहीत. 
केएमटीच्या शंभर गाड्या रस्त्यावर आणायचे म्हटले तरी दररोज सुमारे सात हजार लीटर डिझेल लागते. सध्या ज्या दहा गाड्या धावतात त्यांच्यापासून प्रवाशी उत्पन्न वीस ते बावीस हजार इतके आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टंन्स राखणे गरजेचे आहे. सध्या जेमतेम वीसच प्रवाशी सध्या प्रवास करू शकतात. कोरोनाचे संकट आणखी काही दिवस कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे वीस प्रवाशांच्या जोरावर सेवा सुरू करणे परवडणारे नाही. 
एस. टी. सेवा सुरू झाल्यानंतर केएमटी सुरू होईल, अशी अपेक्षा होती. 1 जूनपासून सुरू करण्याची शक्‍यता होती. नंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली आणि केएमटी सुरू होण्याची शक्‍यता मावळली. केएमटीच्या चाळीस गाड्या आपत्कालीन सेवेत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे सुमारे अडीच कोटी रूपये बिलापोटी थकीत असल्याचे केएमटी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. 
रोजचे सव्वा आठ लाख रूपये उत्पन्न असलेल्या केएमटीच्या तिजोरीत सध्या दिवसाकाठी वीस ते बावीस हजार जमा होत आहे. डिझेलचा खर्च आहेच शिवाय एका गाडीमागे किमान ऐंशी हजार रूपये विमा भरावा लागतो. अन्य करांचा बोजा आहे. गाड्यांच्या देखभाल दुरूस्तीचा खर्चही मोठा आहे. चार महिन्यापासून 75 टक्के पगार सुरू आहे. 

दंडाच्या पावत्याही झाल्या कमी 
चालक वाहकांच्या हाताला काम नसल्याने त्यांना मास्क न लावणाऱ्यांच्या दंडाच्या पावत्या करण्याचे काम दिले गेले. आता बहुतांशी लोक मास्कचा वापर करत असल्याने दंडाच्या पावत्याही कमी झाल्या आहेत. कोरोनामुळे लोकांची पै पाहुण्यांकडील ये-जा थांबली आहे. शहरात कामानिमित्ताने यायचे म्हंटले तरी लोक दुचाकी गाड्यांचा वापर करतात. त्याचा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसत आहे.  

संपादन - यशवंत केसरकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT