thief crime case kolhapur alert bike thief
thief crime case kolhapur alert bike thief 
कोल्हापूर

सावधान: गजबजलेल्या रस्त्यावर भर दिवसा मोटारसायकवर चोरट्यांचा डल्ला

राजेश मोरे

कोल्हापूर : रात्रीची नव्हे तर भरदिवसा गजबजलेल्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या मोटारसायकल चोरण्याचा चोरट्यांनी शहर आणि परिसरात धडाकाच लावला. शहरात सीसी टीव्हीचे जाळे असूनही चोरटे वचरढ ठरत आहेत. 


शहर परिसरात काही वर्षापासून मोटारसायकल चोरीचे प्रकार वाढू लागले आहेत. ‘साहेब रस्त्याकडेला मोटारसायकल उभी केली होती. दहा मिनिटे कामासाठी गेलो होते. तेवढ्यात चोरट्याने गाडी चोरून नेली.’ अशी दिवसांतून एक तरी तक्रार पोलिस ठाण्यात येते. गेल्या दोन चार महिन्यांत मोटारसायकलसह चेन स्नॅचिंग, पोलिस असल्याची बतावणी करून किमंती ऐवज लुटून नेण्याचे प्रकार वाढू लागले. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी शहर परिसरात रात्री नाकाबंदी केली जाते. नाकाबंदीतून मोटारीची नंबर प्लेट मोटारसायकलला लावून फिरणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जुना राजवाडा पोलिसांनी मोटारसायकल जप्त केली. 


शहर परिसरात रात्री गस्त नाकाबंदीच्या रूपाने पोलिसांचे अस्तित्व दिसू लागले. काही दिवसापूर्वी मनीषानगर परिसरात अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाची मोटारसायकल चोरून नेली. रंकाळा चौपाटी परिसरातून दुपारी चोरट्याने दोन मोटारसायकल तर मंगळवार पेठ, खासबाग येथून सायंकाळी मोटारसायकल चोरून नेली. महाद्वाररोड येथील कसबा गेट पोलिस चौकीजवळूनही सकाळच्या वेळी अर्धातासाच मोटारसायकल चोरून नेल्याचे दाखल झाले. तर मध्यवर्ती बस स्थानक ते रेल्वे फाटक रस्त्यावर पार्किंग केलेली मोटारसायकल दोघा चोरट्यांनी चोरून नेली. 

नागरिकांच्या अपेक्षा...
  तक्रारीची दखल तातडीने घ्या.
  शहरातील सीसीटीव्हीतील उणिवा दूर करून संख्या वाढवा
  रात्रीसह दिवसाचीही गस्त, नाकाबंदी करा
  रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवा.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT