thiefer theft in ichalkaranji yesterday two people theft for one old man in ichalkaranji kolhapur 
कोल्हापूर

सीआयडी असल्याची बतावणी करत, १४ तोळे दागिने केले लंपास

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : सीआयडी पोलिस असल्याचे भासवून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृद्धाच्या अंगावरील तब्बल १४ तोळे सोन्याचे दागिने लुबाडले. संभाजी चौक परिसरातील किरण गॅसजवळ वर्दळीच्या ठिकाणी दुपारी तीनच्या दरम्यान हा प्रकार घडला. 

याबाबतची तक्रार राजाराम रामेश्‍वरलाल महेश्‍वरी (वय ६८, रा. लक्ष्मी प्रोसेस परिसर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. या घटनेतील दोन्ही संशयित सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : महेश्‍वरी आपल्या मोपेडवरून जुना चंदूर रोडवरील लक्ष्मी व्यंकटेशनगरमध्ये राहणाऱ्या बहिणीकडे जात होते. त्या वेळी त्यांचा दोन्ही संशयितांनी दुचाकीवरून पाठलाग केला. संभाजी चौक ते उत्तम-प्रकाश चित्रपटगृह  मार्गावरील किरण गॅस एजन्सीजवळ महेश्‍वरी आले. त्या वेळी एका संशयिताने त्यांना थांबविले. त्याने सीआयडी पोलिस असल्याचे भासवले. तो म्हणाला, की चाकूहल्ला झाला असून, गावात वातावरण तंग आहे.

अंगावरील दागिने गाडीच्या डिकीमध्ये ठेवा. याचवेळी संशयिताचा दुसरा साथीदार तेथे आला. त्यानेही सीआयडी असल्याची बतावणी करीत अंगठी बॅगेत ठेवत असल्याचे भासविले. त्यामुळे महेश्‍वरी यांनी घाबरून आपले दागिने एका पिशवीत घालून आपल्या मोपेडच्या डिकीत ठेवले. पण, दोघांपैकी एकाने डिकीतील दागिने घेऊन ते मोजत असल्याचे भासविले. याचवेळी संशयितांनी हातचलाखी करीत दागिने लंपास केले. त्यानंतर दोन्ही संशयित तेथून दुचाकीवरून पसार झाले. आवाडेनगर येथे आल्यानंतर महेश्‍वरी यांनी डिकीत दागिने पाहिले असता ते नसल्याचे निदर्शनास आले. आपली लुबाडणूक झाल्याचे समजल्यावर त्यांनी याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुजेटची पाहणी केली. त्यात दोन्ही संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद आहेत. 

लुबाडलेले दागिने असे 

१) चेन (वजन पाच तोळे, किंमत दोन लाख)
२) ब्रेसलेट (वजन आठ तोळे, किंमत तीन लाख २० हजार)
३) अंगठी (वजन एक तोळा, किंमत ४० हजार)

लुबाडलेले दागिने

  • चेन (पाच तोळे, 
  • किंमत दोन लाख)
  • ब्रेसलेट (आठ तोळे, किंमत तीन लाख २० हजार)
  • अंगठी (एक तोळा, किंमत ४० हजार)

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT