thief sakal
कोल्हापूर

चंदेरी नगरीत चोरट्यांचे धाडस वाढले : पोलीसांनाच दिले चॅलेंज

चोरीस गेलेल्या मालाची व रकमेची माहिती अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही

बाळासाहेब कांबळे

हुपरी : परिसरात गेल्या दोन दिवसांत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आता तरी चक्क हुपरी पोलीस ठाण्या समोरील मोबाईल शाॅपीच फोडण्याचे धारिष्ट्य दाखवत उघड चॅलेंज दिले आहे. पोलीसांचा धाक उरला नसल्याची चर्चा होत आहे.

येथील पोलीस ठाण्या समोरच सुहास बसवेश्वर चिखले यांचे मोरया मोबाईल शाॅपी हे मोबाईल व इतर ॲक्सेसेरीज विक्री व दुरूस्तीचे दुकान आहे. शुक्रवारी (ता.२६) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुलूप बंद असलेल्या दुकानाचे शटर कटावणी सारख्या हत्याराने उचकटून आत प्रवेश करून किंमती मोबाईल तसेच इतर ऐवज लंपास केला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

घटनास्थळी हुपरी पोलीसांसह श्वान पथक तसेच ठसेतज्ञ दाखल झाले आहेत. पोलीसांनी चौकशी सुरू केली असून चोरीस गेलेल्या मालाची व रकमेची माहिती अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही आहे.

काल पट्टण कोडोली येथे एका बीअर बार, तसेच देशी मद्याच्या दुकानात तर रांगोळी मध्ये चोरीची घटना घडली होती. या घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी अवघ्या काही अंतरावर पोलीस ठाण्या समोरच असलेल्या मोबाईल शाॅपी मध्ये धाडसी चोरी करण्याचा प्रकार घडला. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धती बद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT