third day of diwali festival laxmi pujan celebrate in home in kolhapur 
कोल्हापूर

दीपोत्सव सजला, लक्ष्मी नटली ! घराघरांत आनंदाचे भरते

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आया-बहिणींना मिळू दे सुरक्षा-समानतेचे स्थान, हाच खरा "लक्ष्मी'च्या पूजनाचा सन्मान...', 'संकटातही गाऊ माणुसकीचे गीत...मनांमनांत पेटवू चांगुलपणाचे दीप...' असा संकल्प करत आज सर्वत्र दीपोत्सवाचा सोहळा सजला. कोरोनाच्या भीतीची जळमटं दूर सारत मात्र तरीही खबरदारी घेत मांगल्य आणि समृद्धीचा हा सण चैतन्यदायी वातावरणात सर्वत्र साजरा झाला. सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर साऱ्यांनीच दीपोत्सवाचे सहकुटुंब सेलीब्रेशन साजरे केले. 

दरम्यान, सोमवारी (16) दिवाळी पाडवा व भाऊबीज असून या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ सज्ज झाली आहे. अनेक ऑफर्सचा खजीना यानिमित्ताने ग्राहकांसाठी खुला झाला आहे. दीपोत्सवाचा आज मुख्य दिवस. साहजिकच भल्या पहाटेच घरांना जाग आली आणि अभ्यंगस्नानाची तयारी सुरू झाली. त्याचवेळी रेडिओवरचे 'आली माझ्या घरी ही दिवाळी' अशा गीतांनी सारा माहौल सूरमयी झाला. एरवीचा फटाक्‍यांचा दणदणाट मात्र यंदा कुठल्या कुठे विरून गेला. नवीन कपड्यातलं रूपडं वारंवार न्याहाळत बालमित्रांचा आनंद टीपेला पोचला. आजची न्याहारी म्हणजेच दिवाळीचा फराळ. सहकुटुंब फराळावर ताव मारत घराघरांत आनंदाचे भरते आले. 

एकीकडे दीपोत्सवाचा आनंदोत्सव सुरू असतानाच लक्ष्मीपूजनासाठी दिवसभर बाजारपेठ सज्ज होती. झेंडूची फुले, फळे, साळीच्या लाह्या, बत्तासे, ऊस, आंब्याच्या डहाळ्या अशा सर्व वस्तूंनी बाजारपेठ सजली होती. दुपारनंतर सर्वत्र लक्ष्मीपूजनाची धामधूम सुरू झाली. सायंकाळी पाच वाजून 58 मिनिटांपासून रात्री आठ वाजून 32 मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता. पारंपरिक लक्ष्मीच्या छायाचित्रासह कलशातील नारळावर बाजारात मिळणारे डोळे, मुकुट, नथ लावून अनेक ठिकाणी श्री लक्ष्मी नटली. घरांघरांतील आनंदोत्सवाबरोबरच रात्री व्यापारी पेठांतही लगबग सुरू झाली. दुकानांची स्वच्छता करून केळीची पाने, उसाने दुकानांची दारे सजली आणि व्यापाऱ्यांनीही दिवाळी साजरी केली. 

आनंद पेरणारी दिवाळी

 दिवाळीच्या या आनंदोत्सवाच्या निमित्ताने विविध संस्था, संघटनांनी विविध सेवाभावी संस्थांना भेट देवून तेथील अनाथ, निराधार, ज्येष्ठांसमवेत दिवाळी साजरी केली. अजूनही विकासाचा प्रकाश अनेक डोंगर-कपाऱ्यांतील गावांत पोचलेला नाही. अशा ठिकाणी जावूनही काही संस्थांनी तेथील कुटुंबांसमवेत सण साजरा केला.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री घायवळ गँगचा धुमाकूळ; गोळीबारात एक जण गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माेठी बातमी! 'शिरवळमध्ये भरदिवसा गाेळीबार'; घटना सीसीटीव्‍हीत कैद, तिघांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ, नेमकं काय घडलं..

Chh. Sambhajinagar Accident : माळीवाडा पुलावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य

सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘या’ लाखो लोकांचे जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार आणि पोलिसांकडून दाखले जप्त होणार, नेमका आदेश काय?, वाचा...

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

SCROLL FOR NEXT