Thirty per cent beds in all hospitals should be reserved for non-corona: Chandrakant Jadhav 
कोल्हापूर

सर्व रुग्णालयांत तीस टक्के बेड, कोरोना नसलेल्यासाठी राखीव ठेवा ः चंद्रकांत जाधव

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर, ः कोरोना नसलेल्यांवर उपचारांसाठी सर्व रुग्णालयातील तीस टक्के बेड राखीव ठेवावेत, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाबाधितांचे आकडे रोज वाढत होते, या काळात सर्व रुग्णालयामध्ये फक्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्राधान्याने उपचार केले जात होते. तर दुसरीकडे कोरोना नसलेल्या रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोरोनावर उपचार करतानाच कोरोना नसलेल्या (नॉन कोविड) रुग्णांकडे मात्र खाजगीसह शासकीय रुग्णालयाकडून दुर्लक्ष होत आहे. 
अपघात, प्रसुती, किडनीचा आजार, मधुमेह, हृदयविकार, मणक्‍याचे आजार, मेंदुचे आजार व पक्षाघात आदी रुग्णांना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार नाकारल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 
काही रुग्णांना कोरोनाची चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आलेले असताना देखील रुग्णालयाने त्यांना दाखल करुन घेतले नाही. यामुळे त्यांना उपचारासाठी अनेक रुग्णालयाकडे भटकंती करावी लागत आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांचे जीवही धोक्‍यात आले आहेत, तसेच काही रुग्णांना उपचार वेळेत न मिळाल्याने मृत्यु ही झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. यामुळे सर्वच रुग्णालयात नॉन कोवीड रूग्णांवरील उपचारासाठी 30 टक्के बेड राखीव ठेवण्यात यावेत. यामुळे नॉन कोविड रुग्णांवर उपचार होतील. कोरोना नसलेल्यावर उपचारांसाठी बेड राखीव ठेवले आहेत, हे तपासण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात यावी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Nashik News : नाशिक रोड परिसरात धक्कादायक घटना: मुंबई-हावडा एक्सप्रेसखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलाने जीवन संपवले

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : मुंबईतील ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीचा मृत्यू, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT