Thirty first police kolhapur ichalkaranji police
Thirty first police kolhapur ichalkaranji police 
कोल्हापूर

थर्टी फर्स्टसाठी तगडा बंदोबस्त ; पोलिसांकडून जोरदार तयारी 

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : सरत्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात राहणार आहे. शहरात सर्वत्र नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध प्रकारावर विशेष लक्ष राहणार आहे. शोध मोहिमेद्वारे रश ड्रायव्हिंग, ओपन बार व मद्यमान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी प्रत्येकाकडून वेगवेगळे बेत आखले जात आहेत. शहरात विविध ठिकाणी पार्ट्या, संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून योग्य नियोजन केले आहे. स्थानिक पोलिस ठाण्यांना रात्री योग्य बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांची पथके शहरात विविध ठिकाणी तैनात असणार आहेत. चौकाचौकांत वाहनांची तपासणी केली जाणार असल्याने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्या प्रत्येक अवैध कृत्यावर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. 

शहरात 15 पोलिस अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली 200 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात राहतील. मद्य पिऊन वाहन चालवणारे टार्गेटवर असणार आहेत. यासाठी फिक्‍स पॉईंट लावण्यात येणार असून, दुचाकीवरून पोलिस गस्त घालतील. विनाकारण भटकंती, हुल्लडबाजी, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. 31 डिसेंबरच्या रात्री विविध भागांतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा वेगळा बंदोबस्त असणार आहे. 
 
हॉटेल, व्यापाऱ्यांना सक्त सूचना 
थर्टी फर्स्ट व नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिक व व्यापाऱ्यांची बैठक घेतली आहे. ज्या ठिकाणी मद्य मिळेल, अशा अस्थापनांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व हॉटेल व इतर व्यापाऱ्यांना रात्री 11 वाजता अधिकृतपणे आस्थापना बंद करण्याची सक्त ताकीद आहे. 

हे पण वाचा हाय व्होलटेज ड्रामा ; आम्ही तयार, तुमचे काय ? राजू शेट्टींना घेरण्याची विरोधकांची खेळी  
 
कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत सर्वांनी साध्या पद्धतीने जल्लोष साजरा करावा. रात्री विनाकारण नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये. हुल्लडबाजांवर प्रभावीपणे कारवाई केली जाणार आहे. 
-बी. बी. महामुनी, पोलिस उपाधीक्षक 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT