thirty seven people have been poisoned in manewadi taluka hatkangle 
कोल्हापूर

रक्षाविसर्जन कार्यक्रमात घेतले जेवण ; ३७ जणांना झाली विषबाधा...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - पाडळी येथील मानेवाडी (ता. हातकणंगले) येथे रक्षाविसर्जन कार्यक्रमात दिलेल्या अन्नातून ३७ जणांना विषबाधा झाली. नातेवाईक आणि भावकी मंडळींना यावेळी जेवण देण्यात आलं होतं. विषबाधा झालेल्या रुग्णांवर नवे पारगावच्या ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. घटनेची नोंद पेठवडगाव पोलिसांत झाली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अन्न, पाण्याची  केली तपासणी केली

 पाडळी (ता.हातकणंगले) गावाच्या पश्चिमेस मानेवाडी वस्ती आहे.येथील एका वृद्धाचे बुधवारी (ता. २९) रक्षाविसर्जन झाल्यानंतर भाऊबंध व नातेवाइकांनी मिळून सुमारे साठ जणांनी जेवण केले. दरम्यान यातील अनेकांना गुरवारी पहाटेपासूनच पोटदुखी, जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांना नवे पारगाव येथील ग्रामीण रुणालयात दाखल केले. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अन्न, पाण्याची तपासणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी रुग्णांची विचारपूस केली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एम. जी. जमादार, बी. एस. लाटवडेकर, ज्योती कांबळे, अनिता शहा, शैलेश गायकवाड, जेसिका, शिखरे व परिचारिकांनी उपचार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Rare Albino Snake : काळा नाहीतर चक्क पांढराशुभ्र! सिंधुदुर्गातील पावशीत आढळला अत्यंत दुर्मीळ विषारी 'अल्बिनो मण्यार'; गुळगुळीत शरीर अन्.. काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT