Thorough interrogation of citizens coming in Kurundwad city 
कोल्हापूर

कुरुंदवाड शहरात परगावाहून येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी

सकाळवृत्तसेवा

कुरुंदवाड : कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने शहरात प्रभागनिहाय लॉकडाउन केले आहे. हेरवाड ग्रामपंचायतीने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 22 जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवले आहे. त्यांच्या कुटुंबीयांचे घरातच अलगीकरण केले आहे. दरम्यान, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी कुरुंदवाड पालिकेला व हेरवाड ग्रामपंचायतीला भेट दिली. 

शहरात 11 कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने पालिकेने माळभाग, सन्मित्र चौक, भालचंद्र थिएटर परिसर, बागवान गल्ली, बाजारपेठेत बॅरिकेडस लावून प्रभागनिहाय बंदिस्त केले. परगावाहून येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी सुरू आहे. याची नोंदही घेतली आहे. कुरुंदवाड व लक्ष्मीनगरातील रुग्णांच्या संपर्कातील 11 जणांना स्वॅब तपासणीसाठी नेले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना पालिकेने घरातच अलगीकरण केले आहे. तहसीलदार डॉ. सौ. मोरे-धुमाळ यांनी मुख्याधिकारी निखिल जाधव यांची भेट घेऊन माहिती घेतली. 

पालिकेची कर्मचारी मास्क न लावणाऱ्या नागरिकांना हात जोडून मास्क वापरण्याची विनवणी करीत होते. आजही मास्क न लावणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्यांकडून 10,700 रुपये दंड वसूल केला. 
हेरवाड ग्रामपंचायतीने रुग्णाच्या संपर्कातील 22 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेऊन कुटुंबांना घरातच अलगीकरण करून त्यांचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र केले आहे. सरपंच सुरगोंड पाटील, ग्रामविकास अधिकारी सौ. पी. आर. कोळेकर यांनी त्या क्षेत्रातील ग्रामस्थांची थर्मल तपासणी आणि आरोग्य तपासणी सुरू केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT