three brothers killed boy in kolhapur 
कोल्हापूर

भांडणात मध्यस्थी केल्याने तिघा सख्या भावांकडून तरूणाचा खून 

राजेश मोरे

कोल्हापूर - शेजाऱ्यांच्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून कोयत्याने तरूणावर हल्ला करण्यात आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आकाश आनंदराव वांजोळे (वय 28, रा. वासुदेव कॉलनी) असे मृत तरूणाचे नाव आहे. वासुदेव कॉलनी, क्रांतीसिंह नाना पाटीलनगरात बुधवारी रात्री उशीरा हा प्रकार घडला. याप्रकरणी करवीर पोलिसात तिघा सख्या भावांवर गुन्हा दाखल झाला. भरत दिलीप कचरे (वय 32), सुरेश दिलीप कचरे (वय 29), मारुती दिलीप कचरे (वय 34) अशी संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती, दत्तात्रय तम्मा फोंडे (वय 30) हे फुलेवाडी रिंगरोडवरील वासुदेव कॉलनी बॉलच्या कारखान्याजवळ राहतात. याच भागात आकाश वांजोळे हे राहत होते. ते रस्ते कॉट्रक्‍टर म्हणून काम करत होते. फोंडे व त्यांचे शेजारी कचरे कुटुंबात वारंवार वाद सुरू होते. या वादात आकाश वांजोळे हे मित्र फोंडेच्या बाजूने मध्यस्थी करत होते. याचा कचरे कुटुंबाला राग होता.

 दरम्यान, बुधवारी (ता.6) रात्री दत्तात्रय फोंडे व कचरे कुटुंबात गटारीत कचरा टाकण्याच्या कारणावरून भांडण सुरू झाले. दरम्यान रात्री जेवण करून आकाश हे घरातून बाहेर पडले. त्यांना या भांडण्याची माहिती मिळाली. तसे ते फोंडेच्या घराजवळ दाखल झाले. संशयित भरत कचरे, सुरेश कचरे, मारुती कचरे हे तिघे भाऊ कोयत्याने दत्तात्रय फोंडेना मारत होते. त्यात ते जखमी झाले. हा प्रकार पाहून वांजोळी यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिघा भावांनी त्यांच्यावरही हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी सीपीआरला दाखले केले. परंतु, उपचार सुरू असतानाच वांजळे यांचा मृत्यू झाला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरण विशेष सत्र न्यायालयाकडे वर्ग

LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

SCROLL FOR NEXT