three Corona positive patient found in gadhinglaj kolhapur 
कोल्हापूर

गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचे तीन नवे रुग्ण...

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज - सोमवारी (ता.१८) रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार गडहिंग्लज तालुक्यातील दोघे कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यमेहट्टी येथील दोघे तर काळामवाडी गावातील एका युवकाचा समावेश आहे. तिघेही मुंबईहून आलेले आहेत. गावातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात होते. नव्या तीन रुग्णांमुळे गडहिंग्लज तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या चारवर पोहोचली आहे.

मुंबईवरून गडहिंग्लजला...

यमेहट्टी (ता.गडहिंग्लज) येथील कोरोना बाधीत एक युवक सहा दिवसांपूर्वी मुंबईहून (घाटकोपर) आला होता. मुंबईवरुन आल्यानंतर गडहिंग्लज येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यानंतर गावात उभारलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात त्याला ठेवले होते. दुसरा 34 वर्षीय युवकही मुंबईवरून आलेला आहे. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये दोघेही कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.तर काळामवाडी येथील कोरोना बाधीतही युवक आहे. त्याला गावातील शाळेमध्ये उभारलेल्या विलगीकरण केंद्रात ठेवले होते. त्याचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आहे. दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला समजल्यानंतर आरोग्य विभागाचे व पोलीस दलाचे कर्मचारी गावात पोहोचले आहेत. प्रशासनाकडून त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, शनिवारी कळविकट्टे या गावातील एक युवक कोरोना बाधीत आढळला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजच्या तीन नव्या रुग्णांमुळे गडहिंग्लज तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या चारवर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT