Three died after being crushed under pack in kolhapur 
कोल्हापूर

वाईट बातमी ; भराव विहिरीत ढासळल्याने ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कोडोली (कोल्हापूर) : कोडोली - काखे रोडवरील वारकरी मळ्यामधील जुन्या विहिरीच्या बांधकामाची डागडुजी सुरू असताना बांधकामासह भराव विहिरीत ढासळल्याने विहीर मालकासह तीन जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. महेश वारकरी, सिकंदर जमादार, अमोल सदाकळे (रा. कोडोली, ता. पन्हाळा) अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत; तर नेताजी पाटोळे आणि प्रकाश यशवंत खोचीकर अशी जखमींची नावे आहेत. 


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोडोली-काखे रोडवरील वारकरी मळ्यामधील जुन्या विहिरीचे बांधकाम खराब झाले होते. ते दुरुस्त करण्याचे कंत्राट संजय केशव यशवंत याने घेतले होते. आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान काम संपवून नेताजी पाटोळे विहिरीतून वर येत असताना त्यांना भराव खचताना दिसला. ही बाब ते विहिरीच्या वर उभ्या असलेल्या लोकांना सांगत असताना भराव तुटून विहिरीत पडल्याने विहिरीच्या कडेला उभे असलेले जमादार, सदाकळे, वारकरी, प्रकाश यशवंत खोचीकर हे ढिगाऱ्याबरोबर खाली गेले. स्थानिक नागरिकांना पाटोळे व प्रकाश खोचीकर यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना तातडीने वारणेचा वाघ फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेने येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत दोन जेसीबी, दोन पोकलॅंडच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरू होता. या वेळी तालुका दंडाधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेडगे, शाहूवाडी विभागाचे उपअधीक्षक अनिल कदम, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे, मंडल अधिकारी अभिजित पोवार, तलाठी अनिल पोवार, कोतवाल सिराज अंबी, सरपंच शंकर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. रेसकोर्स फोर्स, गनिमी कावा, कोडोली पोलिस व स्वयंसेवक गर्दी पांगवत होते. रात्री उशिरापर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. 


विहिरीचा भराव पडल्याने भरावाखाली अडकलेल्या तिघांचा शोध युद्धपातळीवर सुरू केला. त्यासाठी आवश्‍यक यंत्रणा उपलब्ध करून दिल्या. 
- शंकर पाटील, सरपंच, कोडोली 

ढिगाऱ्याखाली सापडलेल्या तिघांचाही शोध सुरू होता; मात्र रात्री उशिरा या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. 
- प्रसाद संकपाळ, प्रमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन 


कोल्हापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT