Radhanagari Dam Panchganga River esakal
कोल्हापूर

Kolhapur Rain Update : राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा खुले; पंचगंगेच्या पातळीत किती झालीये वाढ? 'इतके' बंधारे अजूनही पाण्याखाली

राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) तीन स्वयंचलित दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पाणलोट क्षेत्रात सरासरी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.

Radhanagari Dam Water Level Update : जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिली. आज (ता.१) जिल्ह्यात ग्रीन अलर्ट (Green Alert) दिला असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने (Meteorology Department) व्यक्त केला आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात सरासरी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.

सकाळी सहा वाजता ३७ फूट १ इंच असणारी पाणीपातळी रात्री ९ वाजता ३४ फूट २ इंचापर्यंत खाली आली आहे. पंधरा तासांत तीन फूट पाणी पातळी कमी झाली आहे. राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) तीन स्वयंचलित दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. धरणातून एकूण ५६८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे, तर जिल्ह्यात २७ बंधारे पाण्याखाली आहेत.

कुंभी प्रकल्पांतर्गत कळे बंधाऱ्यावरील पाणी ओसरले आहे. तसेच, जिल्ह्यात मागास असणाऱ्या पेरण्या आता अंतिम टप्प्याकडे जात आहेत. मागास होणाऱ्या पेरण्यांना पावसाळ्यानंतरही काळजी घ्यावी लागणार असल्याची परिस्थिती आहे. कोल्हापूर शहरातील गायकवाड वाड्याजवळ आलेले पाणी आता पात्राकडे जात आहे. ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे, तो रस्ता शेवाळल्याने महानगरपालिकेने हे शेवाळ काढून वाहतुकीसाठी सुरक्षित केले आहे.

धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • राधानगरी ८.३६ ८.३४

  • तुळशी ३.४७ २.२५

  • वारणा ३४.३९ २९.१३

  • दूधगंगा २५.३९ १७.६२

  • कासारी २.७७ २.२८

  • कुंभी २.७१ २.२८

  • पाटगाव ३.७१ ३.०७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT