three new college are included in shivaji university kolhapur from other three tehsil in kolhapur 
कोल्हापूर

तीन नव्या महाविद्यालयांना शिवाजी विद्यापीठाची मान्यता

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठांतर्गत तीन नव्या महाविद्यालयांना आज परवानगी देण्यात आली. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांची ही महाविद्यालये असून या वर्षीपासून तेथे अध्यापन सुरू होईल. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या बैठकीत ही मान्यता दिली.

विद्यापीठाने बृहत आराखड्याअंतर्गत काही वर्षांत नवीन महाविद्यालये सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव मागविले होते. आवश्‍यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाने हे प्रस्ताव शासनास सादर केले. त्यानंतर या वर्षी तीन नवीन महाविद्यालये सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यात ज्ञानसागर बहुद्देशीय संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोनोली तर्फ असंडोली (पो. गारिवडे ता.राधानगरी), डॉ. तानाजीराव चोरगे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, नंदवाळ (ता. करवीर), जेनेसिस कॉलेज हॉटेल मॅनेजमेंट, मौजे सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) यांचा समावेश आहे. 

विद्यापीठसंलग्न महाविद्यालयांना पाठविण्यात येणारी परिपत्रके व इतर शैक्षणिक माहिती या महाविद्यालयांना पाठविण्यात यावी, असे पत्रक संलग्नता विभागाचे उपकुलसचिव विलास सोयम यांनी काढले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Health: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरणावर भर; NCD मॉडेलमध्ये डिजिटल ट्रॅकिंगचाही समावेश

SCROLL FOR NEXT