Three offenses with a salon owner in kolhapur marathi news 
कोल्हापूर

अरेरे त्यांना चक्क अर्ध्या दाढीसह आणले पोलिस ठाण्यात अन्....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : लॉकडाउनच्या काळात व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या सलून मालकासह दोन ग्राहकांना अर्ध्या दाढीनेच थेट जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. देवकर पाणंद परिसरात आज सकाळी हा प्रकार घडला. अर्ध्या दाढीत आलेल्या दोन ग्राहकांना पाहून पोलिस ठाण्यात चांगलीच करमणूक झाली. या प्रकरणी मालकासह तिघांवर गुन्हा दाखल झाला. संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर अशा स्वरूपाचीही कारवाई आता होऊ शकते, याचेच हे उदाहण आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी :

संचारबंदीच्या काळात अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने सुरू ठेवण्यास बंदी आहे. पण, याची जाणीव असतानाही देवकर पाणंद परिसरात सलून दुकान सुरू असल्याची माहिती आज जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास या दुकानावर छापा टाकला. त्या वेळी पोलिसांना दुकान मालक राजेश प्रभाकर रणवरे (वय 37, रा. शुक्रवार पेठ) याने दुकान उघडे ठेवल्याचे लक्षात आले. या दुकानात दोन ग्राहक दाढी करीत होते.

सलून मालकासह तिघांवर गुन्हा

अचानक पोलिसांना पाहून दुकान मालकासह ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली. त्यांनी पोलिसांकडे विनवण्या सुरू केल्या. त्याच्यासह दोन ग्राहकांना अर्ध्या दाढीवरच थेट जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मालक आणि त्या दोन ग्राहक अशा तिघांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

Jaripatka Police Inspector Transfer : लाचलुचपत प्रकरण अंगलट; जरीपटका पोलिस निरीक्षकाची बदली

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT