Three policemen were suspended in connection with the escape of Sridhar Shingate a crime suspect under Moka 
कोल्हापूर

तो निसटला अन् पोलिस अडकले... शिंगटे पलायन प्रकरण....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - मोकाअंतर्गत गुन्ह्यातील संशयित श्रीधर शिंगटेच्या पलायन प्रकरणी सहायक फौजदार भारत बारटक्के, कॉन्स्टेबल अनिल पाटील आणि वर्षा बागडी यांना आज पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी निलंबित केले. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. 

मद्यतस्करीसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या श्रीधर शिंगटेला पोलिसांनी २५ मार्च २०१९ ला अटक केली होती. त्याच्यावर मोकाअंतर्गत कारवाई केली होती. ४ मार्चला त्याला कळंबा कारागृहातून गडहिंग्लज न्यायालयात खंडणीच्या गुन्ह्यात तारखेला नेले होते. आरोप पार्टीची जबाबदारी सहायक फौजदार बारटक्के, कॉन्स्टेबल पाटील व महिला कर्मचारी बागडी यांच्याकडे होती. पण न्यायालयाजवळच्या कॅन्टीनमध्ये नाष्टा करत असताना शिंगटेने नाष्टा करण्यात अडचण येत असल्याचे सांगून हातातील बेडी काढण्यास सांगितली. तेथून त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी घेतली. त्यांनी संबंधित पोलिसांच्या चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी पूर्ण होऊन त्याचा अहवाल अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाला. त्यात तिघा पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाल्याने त्या तिघांचे डॉ. देशमुख यांनी 
निलंबन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

३० नंतर टीम इंडियात एंट्री; ३५ व्या वर्षी विश्वचषक जिंकणारा कर्णधार... सूर्यकुमार यादवचा संघर्ष ते विश्वविजय प्रवासाची प्रेरणादायी यशोगाथा

मुलीची लग्नपत्रिका वाटून परतत होते; मात्र वाटेतच काळानं गाठलं, लग्नाआधीच लेकीचं पितृछत्र हरपलं

Akola News : ‘चिटफंड’चा वाद पेटला, प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत; ‘बीसी’चे पैसे न मिळाल्याने ग्राहक हैराण

SCROLL FOR NEXT