The three suspected students will be sent back to jail for making anti-national declarations 
कोल्हापूर

‘त्या’ तिघांची पुन्हा कारागृहात रवानगी....

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - हुबळी येथे देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी हिंडलगा कारागृहात रवानगी केलेल्या त्या तिघा संशयित विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता. २५) पोलिस कोठडीत घेण्यात आले होते. चौकशी करुन त्यांना गुरुवारी (ता. २७) न्यायालयासमोर हजर केले असता, पुन्हा त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. तत्पूर्वी, त्यांची सकाळी पावणेबाराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

 सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिघांचीही तपासणी ​

बसित असीफ सोफी (वय १९, रा. सीमपुरा, ता. सोपुरे, जि. बारामुल्ला जम्मू-काश्‍मीर), तालीब मजीद अब्दुलमजीद वाणी (वय १९, रा. क्रांडीगम, ता. बिजबेरहा, जि. अनंतनाग, जम्मू-काश्‍मीर) आणि अमीर मोहिद्दीन वाणी गुलाम मोहिद्दीन वाणी (वय २३, रा. बटकोट, ता. पहलगाम, जि. अनंतपूर, जम्मू-काश्‍मीर) अशी त्यांची नावे आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिघांचीही बिम्स वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत त्यांची तपासणी केली. त्यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 
पुलवामा घटनेच्या वर्षपूर्तीप्रसंगी २४ फेब्रुवारीला तालिब, अमीर आणि बसित या युवकांनी हुबळी येथे देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. यानंतर या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्यावर हुबळी ग्रामीण पोलिसांत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका केली. मात्र, या तीनही विद्यार्थ्यांनी केलेल्या कृतीबाबत विविध संघटनांनी जोरदार आवाज उठविल्यामुळे त्यांना पुन्हा अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

Bidkin Bribe Case : बिडकीन ग्रामीण रुग्णालयात लाच प्रकरण उघड; वैद्यकीय अधीक्षकासह दोघे जाळ्यात, परिसरात खळबळ

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Loha News : संतोष म्हणतो आणि फिरून जन्मेन मी..! भारसावडेकरांनी घेतला पुढाकार

KKR vs PBKS Live: इडन गार्डनवर मुसळधार पाऊस... ५-५ षटकांची होणार मॅच, जाणून घ्या cut-off time, लाईव्ह अपडेट्स

SCROLL FOR NEXT