Three villages were razed in search of infected 
कोल्हापूर

कोरोना बाधित परप्रांतीयाच्या शोधात पिंजून काढली तीन गावे 

सकाळवृत्तसेवा

जयसिंगपूर : संभाजीपूर (ता. शिरोळ) येथे वीस वर्षीय परप्रांतीय कामगाराला कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. दरम्यान, पूर्वी तो चिपरी येथे काम करीत असल्याने त्याच्या पत्त्यावरून जयसिंगपूर, चिपरी आणि संभाजीपूरमध्ये गोंधळ उडाला. त्याचा पत्ता शोधण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागली. 

रात्री उशिरा तो संभाजीपूरमधील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. त्याच्याबरोबर आणखी पाच तरुण राहत होते. त्यांचेही स्वॅब घेण्यात येणार आहेत. आज सायंकाळी हा तरुण बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यावर गोंधळाला प्रारंभ झाला. तो चिपरीचा असावा म्हणून प्रशासनाने गाव पिंजून काढले. 

मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या नावाचा शोध लागला नाही. अखेर तो संभाजीपूरमधील असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रशासनाने खबरदारीचे उपाय राबविले. बाधित तरुण परप्रांतीय असून, तो त्याच्या राज्यात जाऊन परतला आहे. त्याच्याबरोबर असणाऱ्या पाच तरुणांचीही तपासणी केली जाईल. याआधी सोलापूरहून आलेला तरुण बाधित निघाला होता. परप्रांतीय तरुणांच्या पत्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली; तर चिपरी गावातही काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. तो तरुण संभाजीपूरचा असल्याचे स्पष्ट झाल्यावर चिपरी गावातील लोकांचा जीव भांड्यात पडला. 

दृष्टिक्षेप 
- संभाजीपूर येथील परप्रांतीय पॉझिटिव्ह 
- त्याच्यासोबतच्या पाच तरूणांचे स्वॅब घेतले 
- पाचही तरूणांची तपासणीही केली जाणार 
- चिपरी गावात भीतीचे वातावरण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT