Tilari Ghat esakal
कोल्हापूर

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'हा' घाट ऑक्टोबरअखेर अवजड वाहतुकीसाठी राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील बऱ्याच ठिकाणी संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

तिलारी घाट अरुंद असल्याने घाटामध्ये वारंवार अपघात होतात. घाट अवजड वाहतुकीस धोकादायक असून, घाटातील तीव्र चढ-उतारामुळे वळणांवर वाहनधारकांची कसरत होते.

कोल्हापूर : पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन घाटातील रस्त्याच्या दोन्‍ही बाजूंचे संरक्षक कठडे कोसळून अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून तिलारी घाटातील (Tilari Ghat) अवजड वाहनांची वाहतूक ३१ ऑक्टोबरअखेर बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी काढले आहेत. दरम्यान, या मार्गाला पर्याय म्हणून आंबोली व बेळगाव जिल्ह्यातील चोर्ला घाटाचा (Amboli Chorla Ghat) पर्यायी म्हणून वापर करता येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील बऱ्याच ठिकाणी संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटातून एसटी वाहतूकही सुरू आहे. त्यामुळे बसचा अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. असे संभाव्य धोके टाळण्यासाठी तिलारी घाटातून अवजड वाहतूक ३१ ऑक्टोबरअखेर बंद करण्यात येणार आहे.

तिलारी घाट अरुंद असल्याने घाटामध्ये वारंवार अपघात होतात. घाट अवजड वाहतुकीस धोकादायक असून, घाटातील तीव्र चढ-उतारामुळे वळणांवर वाहनधारकांची कसरत होते. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. तीव्र वळणांवर वाहन अडकल्यास तेथेपर्यंत क्रेन नेणेसुध्दा अवघड होते. अशावेळी मोठ्या क्रेनचाही अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गुगल मॅपवर बेळगावातून गोव्यास जाणारा जवळचा रस्ता म्हणून तिलारी घाट दिसतो. त्यामुळे वाहनचालक या मार्गाने जातात; पण घाटाचा अंदाज चालकाला येत नाही. त्यामुळे अपघात वा वाहने घाटामध्ये अडकून पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT