This time Bappa will come before the moment 
कोल्हापूर

यंदा बाप्पा येणार मुहुर्ताआधीच 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गणेशोत्सवात मूर्ती आणताना गर्दी होऊ नये. त्यातून ससंर्ग वाढू नये, यासाठी शहरातील बहुतांशी भक्तांनी गणेश मूर्ती चार-आठ दिवस आधीच घरी आणण्याची तयारी केली आहे. यासाठी मूर्तिकारांकडे नोंदणी करण्याची लगबग सुरू आहे. काही जणांनी मूर्ती नक्की करून ती घरी आणली असून, गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना करणार आहेत. यामुळे यंदा गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दिसणारी रस्त्यावरची गर्दी जाणवणार नाही. 

कोरोना संकटाचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय, आरोग्य व पोलिस प्रशासन राबवत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, याबाबतची जनजागृती मोहीम सुरूच आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाचे नियोजन पोलिस यंत्रणेकडून सुरू आहे. त्याची नियमावली शासनाने जारी केली आहे. उत्सवातील गर्दी टाळण्यासाठी पोलिस यंत्रणेने उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. गणेश आगमनादिवशी शहरातील पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅंम्प आदी ठिकाणची गर्दी टाळा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून गणेश भक्तांना करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी शेजारील मैदानाचा पर्यायही पुढे आणला आहे. याबाबत संबंधित घटकांची बैठकीचेही नियोजन केले आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा विचार करून गणेश भक्तांनीही पोलिसांच्या आवाहनाला साथ देण्यास सुरवात केली आहे. संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी भक्तांनी गणेश मूर्ती चार-आठ दिवस आधीच घरी आणण्याची तयारी सुरू केली आहे. सार्वजनिक मंडळांनीही याचे अनुकरण करण्याची तयारी दर्शवली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Latest Maharashtra News Updates : धुळे बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

SCROLL FOR NEXT