Time For Hundlewadi Residents To leave The Village Due To Lack Of Roads Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

रस्त्याअभावी गाव सोडण्याची हुंदळेवाडीवासियांवर वेळ

अशोक पाटील

कोवाड : हुंदळेवाडी (ता. चंदगड) गावला जोडणारा एकमेव रस्ता आहे. ग्रामस्थांना याच रस्त्यावरुन ये-जा केल्याशिवाय पर्याय नाही. अरूंद असणाऱ्या या रस्त्यावरुन दुतर्फा वाहतूक करता येत नाही. एकेरी वाहतूकीमुळे ग्रामस्थांची वारंवार अडचण होते. रस्त्याअभावी येथील ग्रामस्थ गाव सोडून अन्य ठिकाणी जाऊ लागले आहेत. गेल्या दहा वर्षात किमान 20 कुटूंबानी गाव सोडले आहे. रस्त्याचे रुंदीकरण केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार असून लोकप्रतिनिधीसह शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेऊन रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. 

कोवाडपासून अवघ्या दिड किलोमीटर अंतरावर हुंदळेवाडी गावची वस्ती आहे. प्रो-कबड्डीचे खेळाडू सिध्दार्थ व सुरज देसाई यांच्यामुळे देशपातळीवर या गावची महती गेली आहे. किणी फाट्यावरुन ते हुंदळेवाडी गावापर्यंत एक किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. पाचशे लोकवस्तीच्या या गावाला जोडणारा हा एकच रस्ता आहे. येथील ग्रामस्थांना गावातून बाहेर पडण्यासाठी व गावात येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. पण, रस्ता अरुंद असल्याने वाहतूकीची सतत कोंडी होते. दोन्ही बाजूने वाहने समोरासमोर आली, तर त्यातील एका वाहन चालकाला वाहन शेवटपर्यंत मागे घेतल्याशिवाय रस्ता खुला होत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती आहे. त्यामुळे दरवर्षी रस्त्याची रूंदी कमी होत आहे.

आजारी व्यक्तिला तातडीने वाहनातून घेऊन जाताना अनेकवेळा ग्रामस्थांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे गेल्या वीस वर्षापासून येथील ग्रामस्थ रस्त्याच्या रूंदीकरणाची मागणी करत आहेत. लोकप्रतिनिधीसह शासकीय अधिकाऱ्यांनी या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्याच्या अडचणीमुळे येथील काही कुटूंबे कोवाड, बेळगाव अशा ठिकाणी घरे बांधून वास्तव्याला जात आहेत. गाव सोडणे हा त्यावरचा उपाय नाही. यामध्ये सामान्य लोकांचे हाल होत आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने हा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी होत आहे. 

लोकप्रतिनिधीच जबाबदार
गेल्या अनेक वर्षापासून आम्ही गावकऱ्यांनी रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्‍न लोकप्रतिनिधीच्या निदर्शनाला आणला, पण अद्याप काहीच हालचाली होत नसल्याने रस्त्याच्या अडचणीमुळे लोक गावातून बाहेर जाऊ लागले आहेत. याला लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत. 
- अविनाश देसाई, ग्रा. प. सदस्य, हुंदळेवाडी 

रुंदीकरणाची मागणी करणार
रस्त्याअभावी हुंदळेवाडी ग्रामस्थांची अडचण होत आहे. रूंदीकरणाचा मोठा प्रश्‍न आहे. ग्रामपंचायतीकडून अनेकवेळा या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी केली आहे. लवकरच आमदार राजेश पाटील यांची भेट घेऊन रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी करणार आहे. 
- सुप्रिया कांबळे, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, कागणी-हुंदळेवाडी 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

शेतकरी दुष्काळाने होरपळतोय, नेते खातायत सुकामेवा, आढावा बैठकीत काजू बदामचा नाश्ता

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!

SCROLL FOR NEXT