tirupati balaji mandir closed because of corona virus 
कोल्हापूर

मोठी बातमी : कोरोना व्हायरसमुळे तिरुपती बालाजी देवस्थानने घेतला मोठा निर्णय...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरासह भारतात ही वाढत असल्याने भारतातील विविध राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. खबरदारी म्हणुन देशातील विविध मंदिरे तसेच इतर प्रार्थना स्थळे बंद करण्यात येत आहेत.आंध्रप्रदेश मधील तिरुपती बालाजीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.

काल वाराणसी वरुन सुमारे शंभर भाविकांचा समुह तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आला होता परंतु या भक्तांतील एकास तिव्र ताप,सर्दी,खोकला अशी कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने खळबळ उडाली.या संशयित रूग्णास उपचारासाठी तातडीने रूईया येथील आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने तातडीने मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरातील पूजा,विधी या सुरु राहतील परंतु दर्शन मात्र येत्या काही काळासाठी बंद राहिल असं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.या मंदिराकडे देशभरातील भक्तांचा ओढा सतत असतो.परंतु या निर्णयामुळे भक्त दर्शना पासून लांब राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL vs County Cricket वरून वातावरण तापलं! पीटरसनवर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टिका, 'बस कर आता, मुर्खा...'

SIR वैधच! निवडणूक आयोगाला मतदार यादीतून नाव हटवण्याचा आणि समाविष्ट करण्याचा पूर्ण अधिकार : सुप्रीम कोर्ट

Earbuds Safety Tips : कानातले इअरबड्स बनतील 'जाजूस'; पर्सनल बोलणं होऊ शकतं लिक, त्यामुळं चुकूनही सुरू ठेवू नका 'ही' 1 सेटिंग

Gokul Milk Halal Clarification : गोकुळ दूध संघाने हलाल प्रमाणपत्र का घेतलं? परिपत्रकाद्वारे केला खुलासा; 'हलाल' शब्दाचा अर्थही सांगितला

Railway Ticket Price: रेल्वे तिकीटाचे दर वाढणार! प्रवाशांचा खिशाला फटका बसणार; रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT