day Traffic high in kolhapur 
कोल्हापूर

Kolhapur Traffic Update: प्रेक्षणीय स्थळांवर वाहनांची मोठी गर्दी

शिवाजी यादव

कोल्हापूर : कोराना लॉकडॉऊन अपवाद वगळून शिथील झाला अशात सलग सुट्ट्या आल्या त्यामुळे अनेकजन पर्यटनाला आले आहेत. कोल्हापूर शहरातील प्रवेशव्दारांसह मध्यवर्ती भाग व प्रेक्षणीय स्थळांवर वाहनांची मोठी गर्दी झाली अनेक ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावताना पोलिसांची दमछाक झाली. 
बहुतांशी पर्यटक पुणे, मुंबईकडून आल्याने सकाळी सहा वाजल्यापासून तावडे हॉटेल, कावळा नाका ते आंबाबाई मंदिर मार्गावर चार चाकी वाहनांची गर्दी होती. वाटेतील प्रत्येक सिग्नलवर वाहतुक काही काळ रेंगाळत होती. पुढे बिंदू चौक पार्कींगसह शिवाजी पुतळा, वाहतुकीची कोंडी होत होती. तर मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी, खासगी आराम गाड्यांनाही प्रवाशांची गर्दी असल्याने या रस्त्यावरही वाहतुकीचा ताण होता. 


महाव्दारारोड, ताराबाई रोड, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी येथील बाजारपेठेत खरेदी साठीही गर्दी असल्याने यारस्त्यावरही दुचाकी, रिक्षासह अन्य वाहनांची गर्दी होत होती. बहुतांशी प्रसिध्द हॉटेलमध्ये पर्यटक खाण्यासाठी जात होते. तेव्हा हॉटेल लाईन असलेल्या मार्गावर पार्कींगची भली मोठी रांग दुपारी होती रात्रीच्या वेळी या रांगेत आणखी भर पडली. 

पोलिसांनी चोख कामगिरी बजावली 
शहरात जवळपास 40 वाहतुक पोलिसांनी बंदोबस्त केला. याशिवाय पोलिस ठाण्यांचे पोलिस गस्तीसाठी थांबून होते. सिग्नल वरील वाहतुीक नियत्रण बरोबर गर्दीच्या ठिकाणी रेंगाळणारी वाहतुक सुरळीत करणे तसेच वाहने योग्य जागी पार्कीगला मदत करणे अशी काम करीत वाहतुक कोंडी वेळीच टाळण्यात वाहतुक पोलिसांनी यश मिळवले.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT